...तर त्या काँग्रेस नेत्याला दोन लाथा हाणा : सुनील केदार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसशी बेईमानी करणारा कितीही मोठा नेता असेल तर त्याला दोन लाथा हाणा. पुढचे मी पाहून घेईन, अशी खळबळजनक सूचना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केली आहे. सुनील केदार यांच्या या सूचनेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
- महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणी तिघे ताब्यात; सीबीआय चौकशीची मागणी
- गुजरातमध्ये १९ हजार कोटींचे हेरॉईन जप्त, अफगाणिस्तानहून तस्करी
- निलगार गणपती : या गणपतीचा फोटो का काढत नाहीत?
काँग्रेसच्या नागपूर ग्रामीण कार्यालयात आयोजित युवक काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ह्या वेळेस काँग्रेस उमेदवार लढत असताना कोणी बेईमानी केल्यास खपवून घेऊ नका. थेट मला फोन लावा, मंत्रीपद बाजूला ठेवून मदत करीन, असे केदार म्हणाले.
- विधानसभा निवडणुका : राजकारणाचा बदलता चेहरामोहरा
- पंजाब मधील राजकीय भूकंप
- अफगाणिस्तान अंतर्गत संघर्षाच्या वाटेवर
ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तर फेब्रुवारीमध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये नेहमी बंडखोरी होते. तर नेत्यांनी केलेली बेईमानी गाजते. या पार्श्वभूमीवर केदार यांनी हे वक्तव्य केले.