Congress : काँग्रेसनेही गळ टाकला! दोन तगडे नेते पक्षात सामील होणार

राहुल गांधी
राहुल गांधी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Congress : देशातील तरुण आणि उदयोन्मुख चेहऱ्यांना काँग्रेसमध्ये सामील करण्यासाठी काँग्रेसने आता कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा रंगली आहे. ही अपडेट ताजी असतानाच आणखी दोन तरुण नेते काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी या महिन्याच्या अखेरीस काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसशी (Congress) संबंधित विश्वसनीय सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. सूत्रांचे म्हणणे आहे की जर पंजाब प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू असलेला गोंधळ पुढील काही दिवसात पूर्णपणे संपला, तर कन्हैया आणि जिग्नेश शहीद भगतसिंग यांच्या जयंतीला २८ सप्टेबरला काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल हे दोन युवा नेते आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यातील चर्चेमध्ये मध्यस्थी करत आहेत.

काँग्रेसच्या (Congress) एका सूत्राने पीटीआयशी बोलताना सांगितले की, जर पंजाब काँग्रेसमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली तर कन्हैया आणि जिग्नेश २८ सप्टेबरला काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात.

बिहारी असलेल्या कन्हैया जेएनयूमध्ये असताना अटकेनंतर प्रकाशझोतात आले. त्यांनी बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधात भाकपचे उमेदवार म्हणून शेवटची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे, दलित समाजातील जिग्नेश गुजरातच्या वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत.

हे ही वाचलं का?

[visual_portfolio id="37929"]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news