Whatsapp Feature : इंटरनेट नाही, बॅटरी संपली, तरी लोड घेऊ नका! 'असे' आरामात वापरा | पुढारी

Whatsapp Feature : इंटरनेट नाही, बॅटरी संपली, तरी लोड घेऊ नका! 'असे' आरामात वापरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Whatsapp Feature : व्हॉट्सॲप वापरणाऱ्या अब्जावधी युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सॲपने नॉन-बीटा युझर्ससाठी मल्टी-डिव्हाइस फंक्शनॅलिटी फीचर देखील लॉन्च केले आहे.

या फिचर्सच्या माध्यमातून युझर्स त्यांचे व्हॉट्सॲप एकावेळी एकापेक्षा जास्त डिव्हाईसला कनेक्ट करू शकतील. म्हणजेच आपल्या स्मार्टफोन व्यतिरिक्त, आपण लॅपटॉप इत्यादीवर व्हॉट्सॲप वापरण्यास सक्षम असाल. आतापर्यंत हे फिचर फक्त बीटा युझर्ससाठी उपलब्ध होते.

Whatsapp Feature : चार स्वतंत्र डिव्हाईसमध्ये वापरता येईल

व्हॉट्सॲप ट्रॅकर WABetaInfo च्या मते, या नवीन फीचर्ससह, युझर्स त्यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट प्रायमरी डिव्हाइस व्यतिरिक्त चार वेगवेगळ्या डिव्हाईला जोडू शकतील.

तथापि, यापैकी कोणतेही डिव्हाईस दुसरा फोन असू शकत नाही. हे नवीन फिचर्स जूनमध्ये लॉन्च करण्यात आले. मल्टी-डिव्हाइस फंक्शनॅलिटीच्या माध्यमातून युझर्स प्रायमरी डिव्हाइसशी कनेक्ट न करता इतर नॉन फोन डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वापरू शकतात.

Whatsapp Feature : इंटरनेट नसले तरी व्हॉट्सॲप वापरता येणार

या नवीन फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल किंवा बंद असेल तरीही व्हॉट्सॲप खाते चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर चालवता येईल. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसले तरीही तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर वाय-फायशी जोडलेल्या टॅबवर व्हॉट्सॲप वापरू शकता.

व्हॉट्सॲपमध्ये मल्टी-डिव्हाइस सपोर्ट कसे सक्रिय करावे?

सर्वप्रथम आपले WhatsApp अकाउंट उघडा.

होम पेजच्या उजव्या बाजूला तीन-बिंदू मेनू चिन्हावर जा.

लिंक्ड डिव्हाइसेसवर टॅप करा.

मल्टी-डिव्हाइस बीटा वर टॅप करा.

येथे तुम्ही जॉइन बीटा किंवा लीव्ह बीटा वर टॅप करू शकता

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button