Bade Miyan Chote Miyan: अक्षय-टायगरच्या चित्रपटात साऊथ स्टारची धासू एन्ट्री | पुढारी

Bade Miyan Chote Miyan: अक्षय-टायगरच्या चित्रपटात साऊथ स्टारची धासू एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या बडे मिया छोटे मिया या चित्रपटात प्रसिद्ध साऊथ स्टारची एन्ट्री होणार आहे. (Bade Miyan Chote Miyan) हा साऊथ स्टार खलनायकाच्या भूमिकेत असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार आहेत.  निर्माते वाशू भगनानी आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला पुढील वर्षी सुरुवात होण्याची शक्यता आहे. (Bade Miyan Chote Miyan)

akshay kumar

या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या हाती बॉलिवूडचा मोठा चित्रपट

बॉलिवूडचे दोन दमदार अॅक्शन हिरो अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. बडे मियाँ छोटे मियाँ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहते या चित्रपटाबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक दिसत होते. आता त्यात एक मोठे अपडेट आले आहे. आता साऊथचा प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनही या चित्रपटात सामील झाला आहे. तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

tiger shroff
tiger shroff

दिग्दर्शक अली अब्बास जफर म्हणाले, ‘अत्यंत प्रतिभावान पृथ्वीराजसोबत काम करायला मी खूप उत्सुक आहे. या अ‍ॅक्शन एंटरटेनरमध्ये असा पॉवरहाऊस परफॉर्मर असणे हा एक उत्तम अनुभव असेल. या घोषणेबद्दल बोलताना जॅकी भगनानी म्हणाले, ‘बडे मियाँ छोटे मियाँच्या कलाकारांचा भाग म्हणून पृथ्वीराज सुकुमारन हे खूप छान आहे. एक नकारात्मक भूमिका म्हणून चित्रपटात अधिक थरार असेल. अक्षय कुमार, टायगर श्रॉफशिवाय जान्हवी कपूरही या चित्रपटात आहे.

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor

अक्षय आणि टायगर चित्रपट

या चित्रपटाशिवाय अक्षय कुमार लवकरच ‘OMG 2’, ‘सेल्फी’, सूरराई पोत्रूचा हिंदी रिमेक, कॅप्सूल गिल आणि ‘वेदात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. टायगरबद्दल बोलायचे झाले तर तो ‘गणपत’मध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Back to top button