Metro 2 : अनुराग बसुच्या मेट्रो २ मध्ये सारा खान- आदित्य रॉय कपूर | पुढारी

Metro 2 : अनुराग बसुच्या मेट्रो २ मध्ये सारा खान- आदित्य रॉय कपूर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर लवकरच अनुराग बसुच्या मेट्रो २ मध्ये या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सद्य परिस्थितीवर आधारित मेट्रो चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. Metro 2 भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनुराग बसु यांचा चित्रपट असून, अभिनेता आदित्य रॉय कपूर व सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. माहितीनुसार, आदित्य रॉय आणि सारा अली खान यांच्या या चित्रपटात सामाजिक नात्यांचा आंबट-गोड कहाणी पडद्यावर पाहता येणार आहे.

Metro 2 चित्रपटाबद्दल चित्रपट निर्माते भूषण कुमार म्हणाले, अनुराग बसुसोबत काम करणं नेहमीच एक ट्रीट राहिलं आहे.
सद्यपरिस्थितीवर चित्रपट काढणे आणि या चित्रपटाच्या कथेमध्ये आयुष्याचे जाळे विणणे हे अनुरागशिवाय आणखी चांगलं कुणी करू शकत नाही. ते या मनोरंजक कहाणीची जादू दाखवतील.

अनुराग बसु म्हणाले-मेट्रो… सध्याची अशा लोकांची कहाणी अशी आहे की, चित्रपटाच्या सर्वच अद्भुत कलाकारांसोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे. चित्रपटामध्ये माझे प्रेमळ मित्र प्रीतम संगीत देत आहेत. टी-सीरीज बॅनर अंतर्गत या चित्रटात अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अली फजल आणि फातिमा सना शेख यासारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा : 

Back to top button