सरसेनापती हंबीरराव सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर | पुढारी

सरसेनापती हंबीरराव सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या शिलेदारांमधील सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट’ असं ठणकावून सांगणारे हंबीरराव स्वराज्यनिष्ट सेनापती होतेच त्यासोबतच धीरगंभीर आणि सबुरीने काम करणारा योद्धा अशी त्यांची ख्याती होती. अशा या शूरवीराच्या पराक्रमाची गोष्ट सांगणाऱ्या सरसेनापती हंबीरराव सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. रविवार १८ डिसेंबरला दुपारी १ वाजता हा ऐतिहासिक सिनेमा भेटीला येईल.

सुप्रसिद्ध अभिनेता प्रवीण तरडे यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनासोबतच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका देखील साकारली आहे. तर अभिनेता गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा दुहेरी भूमिकेत आहे.

Back to top button