Genelia Deshmukh : जेनेलियाने शेअर केला आईचा फोटो, दिल्या बर्थडे शुभेच्छा (Old Photos) | पुढारी

Genelia Deshmukh : जेनेलियाने शेअर केला आईचा फोटो, दिल्या बर्थडे शुभेच्छा (Old Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री जेनेलिया देशमुखने आपल्या आईला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पहिल्यांदाच आपल्या आईसोबतचे जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेनेलिया (Genelia Deshmukh) आपल्या आईसोबत असून ती खूप लहान दिसतेय. जेनेलियाने काही फोटो शेअर केले असून आपल्या आईसाठी एक मोठी पोस्ट लिहिलीय. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जेनेलियाने काय म्हटलंय पहा- (Genelia Deshmukh)

माझी प्रिय आई,
लाखो वेळा मी माझे आभार मानायला विसरले आणि त्याहूनही अधिक वेळा काही बोलता आले नाही…
पण आज मी तुम्हाला सांगू इच्छिते…
तू कशी थांबून ऐकतेस ते मला आवडते,
एवढ्या वर्षात तुझ्या पाठिंब्यासाठी,
मला करुणा शिकवल्याबद्दल,
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या सर्व विजयांमध्ये तसेच माझ्या अश्रूंमध्येही सहभागी झालीस,
कधी कृतघ्न वाटले,
मला खरोखर आशा आहे की तू पाहशील
अनंतकाळपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करते
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई 💚
देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आम्हाला आमचे स्वतःचे वैयक्तिक देवदूत मॉम्स म्हणून पाठवले हे खरे आहे 💚💚 

रितेश देशमुखसोबतचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, जेनेलिया आणि अभिनेता रितेश देशमुख यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रितेश आणि जेनेलिया दोघे व्हॅनिटी व्हॅनमधून उतरत असताना या वहिडिओमध्ये दिसते. दोघेही पारंपरिक पोषाखात दिसताहेत. दोघे मीडियाला फोटो पोज देतानाही दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

दरम्यान, या आठवड्यात ‘इंडियन आयडल – सीजन १३’ मध्ये ‘लव स्पेशल’ एपिसोडमध्ये जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख उपस्थिती लावणार आहेत. ते आपल्या वेड या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. जेनेलिया डिसूजादेखील ‘मस्ती’च्या सेटवर रितेश देशमुखच्या प्रेमात पडल्यानंतरचे रहस्य उघडताना दिसणार आहे. रविवारी ‘सेलिब्रेटिंग ड्रीम गर्ल’ शोमध्ये ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी आणि ईशा देओल यांचं आगमन होणार आहे. शोमध्ये विशाल ददलानी, हिमेश रेशमिया आणि नेहा कक्कड परीक्षक म्हणून कम पाहतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button