बिग बॉस मराठी -4 : अमृता धोंगडे आणि प्रसादमध्ये राडा ! | पुढारी

बिग बॉस मराठी -4 : अमृता धोंगडे आणि प्रसादमध्ये राडा !

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात BB High School भरणार असून काही सदस्य विद्यार्थीच्या भूमिकेत आहेत. तर काही शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच टास्कमध्ये आज अमृता धोंगडे आणि प्रसादमध्ये राडा होणार आहे. त्याचे कारण म्हणजे प्रसादने अमृताला नापास केले. अमृता म्हणाली, इथे समजते कोणाची बुद्धी किती आहे. थुकतील तुझ्यावर… आधी वाचायचं बोलायचं. प्रसाद म्हणाला, अंगावर येऊ नकोस. नॉन सेन्स नको वागूस. त्यावर अमृता प्रसादला बधिर म्हणाली. बघूया हा वाद अजून किती वाढला आजच्या भागामध्ये.

किरण माने, विकास आणि राखी चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये किरण म्हणाले, अमृता धोंगडे नक्कीच प्रसादला नापास करणार. राखी म्हणाली, अक्षयला तुम्ही दुसरी संधी नाही देऊ शकणार… सारखा तो कॅप्टन नाही होणार आणि अपूर्वा. किरण म्हणाले, अक्षय – अपूर्वा टार्गेट वर ठेवायचे.

विकास म्हणाला, मी एक करणार त्याने मुद्दा वाढणार. किरण आणि राखी म्हणाली, आज त्यांचे खरे रुप कळेल.

Back to top button