पुढारी ऑनलाईन डेस्क : हिना खान (Heena Khan Breakup) नेहमीच आपल्या सुंदर फोटोज आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. तिने सोशल मीडिया एक पोस्ट केल्याने सर्वांनाच धक्का बसला. खरंतरं ही पोस्ट तिच्या ब्रेकअपची आहे. हिना खानने जेव्हा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर धोका दिल्याची पोस्ट शेअर केलीय, यानंतर लोक हिनाचा आणि हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी (Rocky) चे ब्रेकअप झाल्याचे अंदाज लावत आहेत. (Heena Khan Breakup)
हिना खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीज शेअर केलीय. तिने लिहिलीय, 'धोका हे एक असं सत्य आहे की जे कधीही बदलू शकत नाही.' दुसऱ्या स्टोरीवर हिनाने रिलेशनशीपविषयी लिहिलं आहे. 'ज्यांनी तुम्हाला धोका दिला त्यावर अंधविश्वास करण्यासाठी स्वत:ला माफ करणं विसरु नका. कधी कधी एक चांगलं मन वाईट गोष्टींना पाहू शकत नाही.'
हिनाच्या या दोन पोस्टनी फॅन्सना चिंतेत केलं आहे. सर्व लोकांना वाटत आहे की अभिनेत्री हिना आपल्या लव्ह लाईफ विषयी बोलत असून तिचा ब्रेकअप झाला आहे. हिना खानची ही स्टोरी आता हटवण्यात आली आहे. पण, त्याआधीच पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.
हेही वाचा :