Reshma Shinde : दिपाला पाहून फॅन्सचे बोल- पद्मावत २ मध्ये तुझी जागा पक्की😍 | पुढारी

Reshma Shinde : दिपाला पाहून फॅन्सचे बोल- पद्मावत २ मध्ये तुझी जागा पक्की😍

पुढारी ऑनलाईन डेस्क : रंग माझा वेगळा  मालिकेत दिपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदेचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आह. वांगी रंगाच्या नऊवारी साडीत दिपाने चारचाँद लावले आहेत. रेश्मा शिंदेच्या लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांची नेहमीच पसंती असते. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पर्पल हार्ट इमोजी 💜🌸💜 शेअर करत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. नाकात नथ, नऊवारी साडी, सुंदर केशरचना, शोभतील असे दागिने परिधान करून रेश्माने हा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ती या व्हिडिओमध्ये शृंगार करतानाही दिसते.

व्हिडिओवर एका युजरने लिहिलं आहे की, पद्मावत २ मध्‍ये तुझी जागा पक्की. तर आणखी काही चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये काय म्हटलंय पहा- Beautiful ❤️, 😍😍😍😍, Wah kya baat 😍😍😍❤️, Sweet Reshma di😍😍😍😍😍uraf Dipa di, Wow looking soo gorgeous 😍💜🔥💫👌, Manmohak❤️, खतरनाक 🔥, खूप सुंदर ❤️😍🔥, जामभारी ☺👌, खूप सुंदर दिसते .

रेश्मा शिंदे हिने मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. २०१४ साली तिने लगोरी – मैत्री रिटर्न्स या मालिकेतून पदार्पण केले होते. बंध रेशमाचे, नांदा सौख्य भरे, चाहुल, महाराष्ट्राचा सुपरस्टार, केसरी नंदन अशा मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे. याशिवाय तिने लालबागची राणी, रंग हे प्रेमाचे रंगीले, देवा – एक अतरंगी या चित्रपटात काम केलं आहे. २०१६ मध्ये तिने चाहूल या हॉरर टेलिव्हिजन शोमध्ये शांभवीची भूमिका केली होती.

हेही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

Back to top button