Bipasha Basu : करण सिंह ग्रोवर-देवीचं क्यूट बॉन्डिंग, बिपाशाने शेअर केला फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर सध्या आपल्या बाळासोबत अधिक वेळ घालवत आहेत. (Bipasha Basu) लग्नाच्या ६ वर्षानंतर १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी बिपाशाने देवीला जन्म दिलाय. आई-वडील झाल्यानंतर हे जोडपे खूप आनंदित आहे आणि आपल्या मुलीच्या देवीची झलक चाहत्यांसाठी शेअर करत आहेत. याआधी बिपाशाने ‘देवी’चा हात हातात घेतलेला फोटो शेअर केला होता. आणि आता तिने आणखी एक नवीन फोटो शेअर केला आहे. (Bipasha Basu)
या फोटोमध्ये बिपाशाची लाडकी मुलगी देवी करण सिंग ग्रोव्हर शेजारी शांतपणे झोपताना दिसत आहे. फोटोत वडील आणि मुलगी दोघांचे बॉन्डिंग स्पष्ट दिसत आहे. देवीच्या हातात गुलाबी रंगाचे हातमोजे दिसत आहेत आणि तिचा चेहरा दोन्ही छोट्या हातांनी लपविला आहे. देवी आणि करणचा हा क्यूट फोटो चाहत्यांची मने जिंकत असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिपाशाने या फोटोला This is love❤️🧿 My heart … @iamksgofficial & Devi ❤️🧿 अशी कॅप्शन दिलीय.
लग्नाच्या ६ वर्षानंतर बिपाशा झाली आई
बिपाशा आणि करणचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. लग्नानंतर सहा वर्षांनी ते पालक झाले. बिपाशा बसूने वयाच्या ४३ व्या वर्षी मुलीला जन्म दिला आहे. या कपलच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचे झाले तर, पहिली भेट ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर झाली. या भेटीचे रूपांतर आधी मैत्रीत झाले आणि नंतर हळूहळू दोघेही प्रेमात पडले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर ३० एप्रिल, २०१६ रोजी त्यांनी लग्न केले.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram