Pooja Hegde : पूजाला लाल साडीत पाहून चाहत्यांना फुटला घाम (Photos)

पूजा हेगडे
पूजा हेगडे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या आगामी चित्रपट सर्कसच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सर्कसमध्ये पूजासोबत रणवीर सिंह, जॅकलिन फर्नांडिस आणि वरुण शर्मादेखील असणार आहे. तिने नुकतेच लाल साडीमध्ये काही फोटोज शेअर केले आहेत. डिझायनर अर्पिता मेहताच्या लक्झरी क्लोथिंग सीरीजमझून पूजाने लाल रंगाची साडी निवडली होती. पूजा हेगडे (Pooja Hegde) लाल साडीत खूप बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. साडीसोबत तिने डीप नेक ब्लाऊज घातला आहे. ज्यामुळे ती ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे. सोशल मीडियावर पूजाचे हे फोटो व्हायरल होत आहेत. सर्कस हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी रिलीज होईल. (Pooja Hegde)

पूजाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती लाल रंगाच्या साडीत मॉर्डन लूकमध्ये दिसतेय. तिचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिने लाल रंगाचा टायर्ड साडी नेसली आहे. यासोबत ब्रालेट ब्लाऊज कॅरी केले आहेत.

मॉर्डन स्टाईलवाली साडी

पूजाची ही मॉर्डन स्टाईलसाडी महिला देखील नेसू शकतात. पार्टीमध्ये या साड्यांची फॅशन आहे. तिची या साडीमध्ये कर्वी फिगर दिसतेय. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड शेड लिप, मस्कारा, मिनिमल फाउंडेशन सोबत केस मोकळे सोडले आहेत. जेमस्टोन ईअररिंग्स, ब्रेसलेट, रिंग्ज परिधान केले होते.

हजारांमध्ये आहे साडीची किंमत 

जर तुम्ही या साडीची किंमत पाहाला तर डिझायनरच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही किंमत ५५ हजार रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news