अनुभवा दिव्यत्वाचं दर्शन -ज्ञानेश्वर माउली लवकरचं भेटीला | पुढारी

अनुभवा दिव्यत्वाचं दर्शन -ज्ञानेश्वर माउली लवकरचं भेटीला

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अवलंबल्या जात असलेल्या भक्ती संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वर माउली यांनी रचला आहे. ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आधी पतीचे कोरोनाने निधन, आता मायलेकींचा बुडून अंत झाल्याने कुटुंबच संपले

Anant Chaturdashi : मुंबई महापालिका गणेश विसर्जनासाठी सज्ज

ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माउलींची चरित्रगाथा या मालिकेतून उलगडणार आहे.

Eknath Shinde : पूल दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्थेमार्फत होणार चौकशी

देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वजाचे वाशिमच्या पोहरादेवी संस्थानात पूजन

भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पसायदानासारखी कलाकृती जगाला दिली. संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे.

चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीत प्रवेशाच्या तयारीत असावेत : मुख्यमंत्री

‘जीव माझा गुंतला’ ; शुभ मुहूर्तावर येणार नव्या नात्याला आकार नियतीच्या खेळीने होणार का अंतराचा मल्हार ?

दिगपाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली. दिगपालया मालिकेचं दिग्दर्शनही करणार आहेत. चिन्मय आणि दिगपाल यांनी आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक कलाकृती घडवल्या आहेत. हे दोघंही एखादी कलाकृती अतिशय अभ्यासपूर्वक प्रेक्षकांसमोर आणतात.

या मालिकेसाठी माउलींच्या रचना, ओव्या संगीतबद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक सुरेल अनुभवही मिळणार आहे. चरित्रगाथेतील चमत्कार ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे.

या चरित्रगाथेतून दिव्यत्वाचं दर्शन अनुभवायला मिळणार आहे. नक्की पाहा. २७ सप्टेंबरपासून सोम.-शनि., संध्याकाळी ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

नागार्जुनच्या सुनेच्या घटस्फोटाची चर्चा; पण सामंथा फोटोशूटमध्ये मग्न!

सातारा : अनैतिक संबंध सुरु असतानाच आज्जी आली म्हणून केला खून!

Yavatmal Crime : प्रियकराकडून प्रेयसीच्या पतीचा खून

Back to top button