'ऐसा वैसा प्यार': अदा शर्माच्या भावनिक अभिनयाने सेटवरील सर्वजण भावूक! - पुढारी

'ऐसा वैसा प्यार': अदा शर्माच्या भावनिक अभिनयाने सेटवरील सर्वजण भावूक!

मुंबई; पुढारी ऑनलाईन: भारताचा अग्रगण्य ओटीटी प्लॅटफॉर्म इरोस नाऊने जगभरातील आपल्या प्रेक्षकांचे विविध शैलींमध्ये उच्च दर्जाच्या कन्टेंन्टसह सातत्याने मनोरंजन केले आहे. आता लवकरच ते एक नवीन मालिका ‘ऐसा वैसा प्यार’ घेऊन येत आहेत. ‘ऐसा वैसा प्यार’ ही एक समान धागा असलेल्या वेगवेगळ्या प्रेमकथांची एक सुरेख गुंतागुंत आहे.

या मालिकेचे कथानक जे चार वेगवेगळ्या प्रेमकथा एकमेकांमध्ये गुंतवत एका अनोख्या पॅटर्नमध्ये सादर करणार आहेत. या रोमँटिक मालिकेत साकिब सलीम, निधी सिंह, प्रित कमानी, अहसास चन्ना, अदा शर्मा, ताहा शाह, रजित कपूर आणि शीबा चड्ढा यांसारखे दिग्गज कलाकार असणार आहेत.

या मालिकेचे चित्रीकरण करत असताना दिग्दर्शक आशिष पाटील यांच्या मनात कोरल्या गेलेल्या एका मनोरंजक घटनेविषयी त्यांनी नुकताच खुलासा केला. यात त्यांनी अदा शर्माने एका विशिष्ट भावनिक सिक्वेन्समध्ये आपल्या मनोवेधक अभिनयाने सेटवरील सर्वांना भावूक केल्याचे सांगितले.

यात त्यांनी म्हटले की, ‘अदा शर्मा आतापर्यंत काम केलेल्या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहे. सेटवर आम्ही सर्वजण अदासोबत एक विशेष भावनिक सिक्वेन्स शूट करत होतो. हा ६० सेकंदाचा शॉट होता आणि संपूर्ण फोकस अदा हिचा होता. जेव्हा तिने शॉट पूर्ण केला, तेव्हा माझ्यासह सेटवरचे सगळेच सुन्न झाले होते.

अदाने तो शॉट एका टेकमध्ये पूर्ण करून त्या संवेदनशील सिक्वेन्समध्ये इतका सुंदर परफॉर्मन्स दिला होता. यानंतर सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाला (स्पॉट बॉयपासून ते व्हिडिओग्राफरपर्यंत) प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.

या शूटनंतर सर्वजण काही काळ भावूक झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अदा शर्मा हिची नवी मालिका ‘ऐसा वैसा प्यार’ लवकरच येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button