मन उडू उडू झालं : शीर्षक गीतावर मुंबईच्या रिक्षा चालकांनी धरला ताल - पुढारी

मन उडू उडू झालं : शीर्षक गीतावर मुंबईच्या रिक्षा चालकांनी धरला ताल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : झी मराठीने नव्या नात्यांच्या बंधू गाठी म्हणत ऑगस्ट महिन्यात तब्बल ५ नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच सादर केली. या सर्वच नवीन मालिकांना प्रेक्षकांचं प्रेम आणि उदंड प्रतिसाद मिळतोय. त्यातील एक अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे मंदार देवस्थळी दिग्दर्शित मन उडू उडू झालं. ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत हे मन उडू उडू झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले.

इंद्रा आणि दिपूच्या जोडीवर आणि या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. पण त्याचसोबत या मालिकेच्या शीर्षक गीतावर देखील प्रेमाचा वर्षाव होतोय.

अवधूत गुप्ते आणि आर्या आंबेकर यांनी या मालिकेचं शीर्षक गीत गायलंय. सलील कुलकर्णी यांनी गाणं संगीतबद्ध केलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडतं. इतकंच नव्हे तर गाण्याच्या उडत्या चालीवर मुंबईच्या रिक्षावाल्यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.

या गाण्याच्या धूनवर मुंबईच्या रिक्षा चालकांनी तयार केलेला माहोल व्हायरल होतोय. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यातून मालिकेवर प्रेक्षकांचं असलेलं प्रेम झळकत आहे.

या व्हिडीओवर देखील नेटिझन्स आपल्या प्रतिक्रियांमधून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून अल्पावधीतच मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.

इंद्रा आणि दिपूची अनोखी प्रेमकहाणी पाहण्यासाठी बघायला विसरू नका. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

हेही वाचलं का ? 

Back to top button