ती परत आलीये : ती म्हणजे नक्की कोण? - पुढारी

ती परत आलीये : ती म्हणजे नक्की कोण?

पुढारी ऑनलाईन : झी मराठी वाहिनीवरील ती परत आलीये या आगामी मालिकेची चर्चा सर्वत्र चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे. ती परत आलीये मालिकेतील ती म्हणजे नक्की कोण आहे? तिची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. एक चित्तथरारक चेहरा आणि त्यामागे अंगावर भीतीने काटा आणणारं बॅकग्राउंड म्युजिक असलेला हा प्रोमो पाहून अनेकांची झोप उडाली.

झी मराठीवर रात्री हा प्रोमो प्रसारित झालाय. या प्रोमो नंतरती नक्की कोण आहे? हा भयानक चेहरा आहे की मुखवटा? ती परत आलीये असं विजय कदम आधीच्या प्रोमो मध्ये म्हणतात. आता तिची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली.

विजय कदम म्हणाले…

याबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, “तिचा हा भयावह चेहरा मालिकेत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ती कोण आहे हे मला माहिती पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल.”

विजय कदम व्यतिरिक्त या मालिकेतील कलाकारांची फौज कोण आहे. याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. आता १६ ऑगस्ट रोजीच ती आणि तिची कहाणी प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल.

तेव्हा पाहायला विसरू नका ती परत आलीये १६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

ती म्हणजे नक्की कोण?

मीडिया रिपोर्टनुसार, या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत एक मराठी अभिनेत्री आहे. तिचं नाव आहे-कुंजिका काळविंट.

कुंजिकाने इन्स्टाग्रामवर सुरुवातीलाच यासंदर्भातील एक बातमी शेअर केली होती.

या मालिकेचा एक प्रोमो रिलीज झाला होता. यात एक भयानक थरारक चेहरा दिसतो. पण, या भयानक चेहऱ्यातील अभिनेत्री रिअलमध्ये फारच सुंदर आहे. या मालिकेमध्ये मुख्य पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे कुंजिका काळवीट.

कुंजिका स्वामिनी मालिकेमध्येही दिसली होती.स्वामिनी मालिकेमध्ये कुंजिकाने आनंदीबाईची भूमिका साकारली होती. चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेमध्ये देखील कुंजिकाने काम केले आहे.कुंजिकाने श्रावण क्वीन ही स्पर्धाही जिंकली आहे.

कुंजिकासोबत अभिनेता श्रेयस राजे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत श्रेयसने राजकुमारची भूमिका साकारली होती.

रंग माझा वेगळा : दुरावलेल्या दीपा-कार्तिक यांना मुली एकत्र आणणार का?

राजा राणीची गं जोडी : मोनाऐवजी ‘फँड्री’ फेम ‘ही’ अभिनेत्री झळकणार

आर्या आंबेकर हिचा डेटिंगच्या चर्चेवर खुलासा; मात्र ती पोस्ट गायब

Back to top button