Hardeek-Akshaya Halad : हळद लागताच राणादा लाजला, लग्नाची जोरदार तयारी (video) | पुढारी

Hardeek-Akshaya Halad : हळद लागताच राणादा लाजला, लग्नाची जोरदार तयारी (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुझ्यात जीव रंगला फेम राणादा अर्थातच हार्दिक जोशी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत त्याने राणादाची भूमिका साकारली होती. तर त्याची सहकलाकार अक्षया देवधर (Hardeek-Akshaya Halad) हिने पाकबाईंची भूमिका साकारली होती. हे दोघे आता रिअल लाईफमध्ये एकमेकांचे साथीदार होणार आहेत. राणादा आणि पाठकबाई  लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहेत. आता दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी असून राणा दाची हळद आणि मेहंदी कार्यक्रमाचा सोहळा पार पडला आहे. राणादा ने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हा व्हिडिओ हळदीचा असून त्याचे कुटुंबीयदेखील दिसत आहेत. (Hardeek-Akshaya Halad)

हार्दिक जोशीच्या घरी मेहंदी आणि हळदीचा सोहळा पार पडला आहे. दरम्यान अक्षया देवधरचा ग्रहमख सोहळा पार पडला आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरू होती. मात्र याबद्दल त्या दोघांनी कधी सांगितले नव्हते. मात्र दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. ‘फायनली एंगेज’ अशी कॅप्शन लिहिल अक्षयाने ही आनंदाची वार्ता दिलीय. साखरपुड्यावेळी अक्षयाने पिच रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. तिला मॅचिंग असा ड्रेस हार्दिकने परिधान केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Ramchandra Naik (@amolnaik.cool)

 

View this post on Instagram

 

A post shared by HARDEEK JOSHI (@hardeek_joshi)

 

View this post on Instagram

 

A post shared by HARDEEK JOSHI (@hardeek_joshi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

Back to top button