KL Rahul-Athiya Shetty : केएल राहुलच्या व्लॉगवर अथियाची हटके कमेंट | पुढारी

KL Rahul-Athiya Shetty : केएल राहुलच्या व्लॉगवर अथियाची हटके कमेंट

पुढारी ऑनलाईन डेस्क : केएल राहुल -अथिया शेट्टी (KL Rahul Athiya Shetty Wedding) आपल्या ग्रँड वेडिंगची तयारी करत आहे.  केएल राहुलने सोशल मीडियावर एक नवा व्लॉग पोस्ट केला आहे. राहुलने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नियमित काम करताना दिसतोय. राहुलने आपल्या पोस्टमध्ये कॅप्शन लिहिली की, “जीवनासाठी पंख.” राहुलच्या या पोस्टला तमाम चाहत्यांकडून कमेंट मिळाल्या आहेत. त्याची गर्लफ्रेंड आणि होणारी पत्नी अथिया शेट्टीनेदेखील त्याचे खूप कौतुक केले आहे.

सध्या भारत-बांग्लादेश सीरीज तयारी सुरु आहे. ४ डिसेंबर रोजी ही सीरीज सुरू होणार आहे. तो सध्या बिझी आहे. अथिया-राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या पोषाखाची चर्चा सुरु असताना असं म्हटलं जात आहे की, केएल-अथिया दोघेही डिझायनर पोषाख परिधान करतील. तर दोघांचे लग्न पारंपरिक दक्षिण भारतीय पद्धतीने होईल.

अथियाला डिझायनर मनीष मल्होत्राचे कपडे आवडतात. ​​राहुलने अद्याप स्पष्ट केलेलं नाही की, त्याने कोणत्या डिझायनरचे कपड्यांची निवड केलीय. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा हवेलीमध्ये हे कपल लग्न करणार असल्याची माहिती आहे. या कपलने फाईव्ह स्टार हॉटेल्स सोडून एक आरामदायक घरगुती लग्नाचा पर्याय निवडलाय. सध्या डेट फायनल झालेली नाही. जानेवारी २०२३ मध्ये दोघे विवाहबंधनात अडकतील. के एल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी एकमेकांनी तीन वर्षे डेट केलं आहे.

केएल राहुल २ टेस्ट आणि ३ वनडे खेळण्यासाठी बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. ही सीरीज ४ डिसेंबरला सुरू होईल आणि २२ डिसेंबर रोजी संपेल. यानंतर जवळपास एक महिन्याचा ब्रेक आहे. यादरम्यान, अथिया-राहुल लग्न करतील, असे म्हटलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

Back to top button