मद्य धोरण घोटाळा प्रकरणी रिटेल कंपनीच्या संचालकाला अटक | पुढारी

मद्य धोरण घोटाळा प्रकरणी रिटेल कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने एका रिटेल कंपनीच्या संचालकाला अटक केली आहे. अमित अरोडा असे या संचालकाचे नाव असून तो उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा निकटवर्तीय असल्याचे ईडी सूत्रांचे म्हणणे आहे.

मद्य धोरण घोटाळ्याच्या अनुषंगाने भाजपने काही दिवसांपूर्वी स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यात स्टिंगमध्ये अमित अरोडा दिसून आला होता. गेल्या आठवड्यात ईडीने अरोडाच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात याआधी ईडीकडून मद्य व्यावसायिक समीर महेंद्रू, अरविंदो फार्मा कंपनीचा संचालक शरद रेड्डी, इव्हेंट कंपनीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नायर तसेच विनय बाबू नावाच्या इसमास अटक करण्यात आलेली आहे.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button