Madhuri Pawar : माधुरी पवारचा आजवर न पाहिलेला बोल्ड अंदाज, पाण्यात केलं हॉट फोटोशूट

माधुरी पवार
माधुरी पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लावणी नृत्यांगना माधुरी पवारने आतापर्यंत आपल्या नृत्यानेच नव्हे तर अदाकारीने सर्वांना घायाळ केलं आहे. आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला वेडं लावणारी अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने 'या बया दाजी आलं' म्हणतं तमाम चाहत्यांना वेड लावलं. आता तिचे आजपर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत. जे पाहून तुम्हीही अवाक राहाल. (Madhuri Pawar )

अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. रानबाजार या वेबसीरीजमध्ये माधुरीने भूमिका साकारली होती. या वेब सिरीजची बरीच चर्चा झाली. वेबसीरीजमध्ये बोल्ड दृश्य दाखवल्याने मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. माधुरीला लावणी क्वीन देखील म्हटलं जातं. मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस, तुझ्यात जीव रंगला या टीव्ही मालिकांमधून तिला अफाट लोकप्रियता मिळाली.

माधुरीने ब्लॅक कलरचं आऊटफिट परिधान केलं आहे. पाण्यामध्ये बोल्ड पोज देताना दिसतेय. तिचा हॉट ड्रेस सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. लाईट मेकअप आणि ओलेचिंब मोकळ्या केसांमध्ये माधुरीने फोटोशूट केला आहे. यातील एका फोटोशूटला तिने कॅप्शन लिहिलीय की- If there is magic on this planet, it is contained in water. आणखी काही फोटोंना तिने म्हटलंय- "She's fire and ice you'll fear the cold and crave the burn."

चाहत्यांनी या फोटोंवर उड्या घेतल्या आहेत. तिच्या या फोटोंना कमेंट करण्याचा मेह चाहत्यांना आवरलेला नाही. कमेंट बॉक्समध्ये त्यांनी काय म्हटलंय पहा-"?, That curves spoils my day, भारी दिसतेय माधुरी❤️, डोळे हे जुलमी कडे…..? , Pani me bhi aag lag jayegi ase chij ho tum, आपने तो पाणी मे आग लगा दी?❤️, तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे मला तू खूप आवडतेस मी तुझ्या प्रेमात पडलो आहे ❤️❤️❤️, Prem mange madhuri tumhi tan man dhan sarv tumhi I love you ?❤️❤️, दृष्ट लागलं ❤️❤️, मॅडम ????, अग्गयाया नुसता धूर आणि आग ???, Perfect Curves?, So beautiful, Heardly big uff ??, Lots of sweet sweet thanks?, तु खूप छान दिसतेस आणी तुझ्यात खूप टायलेंट आहे ऑल the बेस्ट तूला माधुरी पवार, रुप कि राणी ❤️, ❤️खूपच सुंदर, Hot Madhuri ❤️1st. Time. Asa look bhagitla ..so hot look ..madhuri man nice look and so hot. ?, Photoshoot kuthe kela ahe?, Hollywood ?, रंग रूप तुझे घायाळ करी असे मधुर रूप आहे माधुरी, Flower nhi tu to fire hai ???, लोग सच कहते है की पानी में आग लग जायेगी सो आज पानी में आग लगा दिया अपने माधुरी जी ?, आग आणी पाणी एकत्र…., Madhuri ji aap ka jawab nahi.This is so amazing, पाण्यात जाळ ?"

ती नेहमी तिचे नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी ती लंडनमध्ये तिच्या नव्या चित्रपटासाठी गेली होती. माधुरीने लंडनमधील साडीतील फोटो शेअर केले होते. त्याचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाच्या शार्ट ड्रेसमधील फोटो शेअर केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news