नुसरत जहाँ यांच्या मुलाचा जन्म दाखला समोर, मुलाच्‍या वडिलांबाबत खुलासा - पुढारी

नुसरत जहाँ यांच्या मुलाचा जन्म दाखला समोर, मुलाच्‍या वडिलांबाबत खुलासा

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या मुलाच्या वडिलांविषयी सोशल मीडियात चर्चा होत होती. सध्या या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून नुसरत यांच्या मुलाच्या वडिलांच्या नावाचा खुलासा झाला आहे.

नुसरत जहाँ यांनी २५ ऑगस्ट रोजी कोलकता येथील रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला होता. यावेळी तिच्यासोबत पती निखिल जैन ऐवजी अभिनेता यश दासगुप्तासोबत होता. त्यांनीच तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते. यानंतरदेखील यशने नुसरतच्या मुलाला कुशीतदेखील घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

याप्रकरणानंतर सोशल मीडियात नुसरतच्या मुलाचा खरा बाबा कोण आहे? अशी चर्चा होत होती. याच दरम्यान नुसरतयांनी निखिल जैनसोबतचा विवाह अवैध असल्याचे सांगितले होते. यानंतर निखिलने ही आपण मुलाची जबाबदारी स्वीकारत नसल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला होता.

सध्या या प्रकरणात महत्वाचा खुलासा झाला आहे. कोलकाता महानगरपालिकेने नुकतेच नुसरतच्या मुलाचे बर्थ प्रमाणपत्र जारी केले आहे. या प्रमाणपत्रात मुलाच्या वडिलाचे नाव उघड झाले आहे.

या प्रमाणपत्रात नुसरत जहाँच्या मुलाच्या वडिलांचे नाव देबाशिष दासगुप्ता असे लिहिले गेले आहे. हे नाव अभिनेता यश दासगुप्ता यांचे अधिकृत नाव आहे, तर मुलाचे नाव ईशान जे दासगुप्ता असे प्रमाणपत्रात लिहिले आहे. यावरून नुसरत यांच्या मुलाचे पालकत्व यश दासगुप्ताने स्वीकारले असल्याचा म्हटलं जातं आहे.

नुसरत जहाँ यांनी उद्योगपती निखिल जैन यांनी १९ जून २०१९ मध्ये दोघांनी तुर्कीमध्ये लग्न केले होते.

लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्यात मतभेदास सुरूवात झाली.

गेल्या वर्षापासून नुसरत आणि निखिल दोघेही विभक्त राहतात.

यानंतर नुसरत यश दासगुप्ताला डेट करत होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button