सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - पुढारी

सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे; पुढारी ऑनलाईन : लोककलावंत सुरेखा पुणेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला. या वेळी गायिका देवयानी बेंद्रे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्‍ये प्रवेश करणार असल्याची माहिती  पुणेकर यांनी रविवारी दिली होती.

उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मागितली होती. त्यानंतर कार्यक्रमामुळे राजकीय पक्षांपासून दूर राहिले. मात्र आता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्‍याचे सुरेखा पुणेकर यांनी सांगितले हाेते.

माझ्यासमवेत १५ ते १० लोककलावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.  मी पक्षाकडे कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले हाेते.

Back to top button