Sahil Khan : कोण आहे हा साहिल खान; ज्याला जॅकी श्रॉफच्या पत्नीनं 'गे' म्हटलं होतं! | पुढारी

Sahil Khan : कोण आहे हा साहिल खान; ज्याला जॅकी श्रॉफच्या पत्नीनं 'गे' म्हटलं होतं!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने मुंबईत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मनोजने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अभिनेता साहिल खान (Sahil Khan) याचा उल्लेख आहे. सुसाईड नोटमध्ये मनोजने साहिल खान याच्यावर छळवणूक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.

मनोजने ज्याच्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे तो साहिल खान देखील फिटनेस ट्रेनर आहे. साहिल खान (Sahil Khan) नेहमीच चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे चर्चेत राहिला आहे.

साहिल खानने ‘नाचगें सारी रात’ या म्युझिक व्हिडिओमधून करिअरला सुरुवात केली होती. एन. चंद्रा यांच्या स्टाइल चित्रपटात त्याने प्रमूख भूमिका केली होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. Xcuse Me मध्येही त्याने काम केले आहे. साहिलने मुळची इराणी असलेली अभिनेत्री निगार खान सोबत २००४ मध्ये लग्न केले होते. मात्र २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. निगारने ‘रुद्राक्ष’, ‘शादी का लड्डू’ आणि शॉर्टकट सारख्या चित्रपटांत काम केले आहे.

त्याचे अनेक सिनेमे अयशस्वी ठरले. त्याची बॉलिवूडमधील कारकिर्द संपुष्टात आली. पण तो वैयक्तिक आयुष्यातील नेहमीच चर्चेत राहिला.

जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ हिने साहिल समलिंगी असून त्यामुळेच त्याने पत्नीपासून घटस्फोट घेतल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

साहिल आणि आयशाने दोघांनी मिळून प्रोडक्शन कंपनी सुरु केली होती. पहिल्यांदा मैत्री आणि त्यानंतर दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या. आयशा साहिल पेक्षा १६ वर्षांनी मोठी आहे. पण काही दिवसांनी दोघांमधील संबंध बिघडले. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते.

एका मुलाखतीत साहिलने आयशा सोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. तर आयशाने साहिलवर ८ कोटी हडप केल्याचा आरोप केला होता. तसेच साहिल याच्या पत्नीनं त्याला एका पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितलं होतं, यामुळेच दोघांचा घटस्फोट झाल्याचा धक्कादायक खुलासा आयशाने केला होता.

बॉलिवूडमध्ये विशेष काही करु न शकल्याने साहिलने स्वतःची जीम सुरु केली. त्यात त्याचा चांगला जम बसला. आता त्याच्यामधील आणि बॉडी बिल्डर मनोज पाटील याच्यातील वाद समोर आला आहे.

साहिलवरील गुन्हे रद्द…

दरम्यान, साहिल खान याच्या विरोधातील २०१५ मध्ये मुंबईत नोंद झालेले दोन एफआयआर मुंबई हायकोर्टाने रद्द केले आहेत. आयशा श्रॉफने फसवणूक आणि धमकीच्या आरोपाखाली साहिलवर गुन्हे दाखल केले होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

Back to top button