fatima sana shaikh : आमिरच्या लेकीच्या साखरपुड्यात ‘दंगल गर्ल’ लाईमलाईटमध्ये | पुढारी

fatima sana shaikh : आमिरच्या लेकीच्या साखरपुड्यात 'दंगल गर्ल' लाईमलाईटमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : दंगल गर्ल फातिमा सना शेखने आमिर खानची लेक इरा खानच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. (fatima sana shaikh) या सोहळ्यातील काही आनंदाचे क्षण कॅमेराबद्ध झाले होते. आता फातिमाने हे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या फोटोमध्ये फातिमा एथनिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फातिमाने बॅकलेस टॉप आणि हाय वेस्ट पँट परिधान केली होती. टॉपला केवळ नॉट्स दिसतात. (fatima sana shaikh)

या फोटोजमध्ये इरा खान, तिचा होणारा पती आणि फातिमा सना शेख हसताना दिसत आहेत. या फोटोंना फातिमाने कॅप्शन लिहिलीय की-What a mad afternoon that was!!! So happy to see guys celebrate Your love and the was so infectious… My heart was swelling with love and affection for both of you. I am glad I could be a part of it. Pyaar pyaar pyaar What a mad afternoon that was!!! So happy to see guys celebrate Your love and the was so infectious… My heart was swelling with love and affection for both of you. I am glad I could be a part of it. Pyaar pyaar pyaar

याआधी तिने याच लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले होते. या फोटोमध्ये फातिमाच्या मागे कार दिसत आहे. पण, या फोटोंच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टसोबत फातिमाने कॅप्शनमध्ये लिहिलं-‘प्रश्न हा आहे की, हे करायला पाहिजे की नाही.

फातिमा ट्रोल

फातिमा सना शेखने चित्रपट दंगलमध्ये आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय ती ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’मध्ये दिसली होती. आमिर खानचा जेव्हा दुसरी पत्नी किरण रावशी घटस्फोट झाला तेव्हा फातिमा सना शेखला खूप ट्रोल करण्यात आले होते. आमिरसोबत तिचे अफेअर असल्याची चर्चादेखील रंगली. फातिमा चित्रपटांशिवाय वेब सीरीजमध्येही दिसली होती.

 

Back to top button