पुढारी ऑनलाइन डेस्क : Volvo Cars Price Hicked : वोल्वो ही लग्जरी ऑटोमेकर कंपनी आहे. कार, बस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांचे वोल्वो (Volvo) उत्पादन करते. या कंपनीने आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
Volvo Cars Price Hicked : या मॉडेलच्या किंमती वाढल्या
XC90, XC60 आणि XC40 च्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. किमतीत वाढ करण्याचे कारण देताना कंपनीने म्हटले आहे. उत्पादनाचा खर्च वाढत असल्याने मजबुरीत निर्णय घ्यावा लागत आहे. असे कंपनीने म्हटले आहे. या नवीन किंमती आजपासूनच लागू करण्यात येणार आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी 24 नोव्हेंबरपर्यंत कार बुक केल्या आहेत. त्यांना जुन्याच किमतीत कार मिळणार आहे. तर जे ग्राहक आजपासून बुकिंग करतील त्यांना नवीन किंमत लागू होईल.
Volvo Cars Price Hicked : हे आहेत नवीन दर
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, XC90 B6 Ultimate ची किंमत 96.50 लाख रुपये , XC60 B5 अल्टीमेटची किंमत 66.50 lakh लाख रुपये, XC40 Recharge P8 Ultimate ची किंमत 56.90 लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे.
दरम्यान या लक्झरी कारच्या किंमती वाढल्या तरी त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेली नाही. या गाड्यांची किंमत वाढल्यानंतरही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे. बुकिंग विंडो उघडल्यानंतर अवघ्या दोन तासात ग्राहकांनी XC40 रिचार्ज एसयूवी या मॉडेलच्या 150 पेक्षा अधिक कार बुक केल्या आहेत.
Volvo Cars Price Hicked : भविष्यात नवीन मॉडेल आणणार
दरम्यान कंपनीने नजीकच्या भविष्यात नवीन मॉडेल आणणार असल्याचेही म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, XC40 रिचार्ज, प्योर इलेक्ट्रिक SUV, XC90 SUV, मिड साइज की SUV XC60, कॉम्पैक्ट लग्जरी SUV XC40 आणि लग्जरी सेडान S90 हे नवीन मॉडेल लवकरच लाँच करणार आहेत. कंपनी आपल्या बंगळुरूच्या प्लांटमध्ये सर्व पेट्रोल माइल्ड-हाइब्रिड मॉडेल्स असेंबल करण्यावर काम करत आहे.
हे ही वाचा :