नाशिक : “आधारतीर्थ’ आश्रम विनापरवानगी, बाल संरक्षण आयोगाच्या पाहणीत बाब उघड | पुढारी

नाशिक : "आधारतीर्थ' आश्रम विनापरवानगी, बाल संरक्षण आयोगाच्या पाहणीत बाब उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वरलगत असलेल्या आधारतीर्थ आश्रमात साडेतीन वर्षीय आलोक शिंगारे याचा गळा आवळून खून झाल्यानंतर आश्रमाच्या परवानगी व कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आलोकच्या खुनानंतर राज्य बाल संरक्षण आयोगाने आश्रमात पाहणी करीत माहिती घेतली असता आश्रम विनापरवानगी सुरु असल्याचे समोर आले आहे. बालकल्याण विभागाची परवानगी न घेता, हा आश्रम सुरू असल्याचे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांऐवजी एकल पालकांचे किंवा निराधार पाल्यांना आश्रमात ठेवल्याचे आयोगाच्या पाहणीत उघड झाले आहे.

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे आधारतीर्थ आश्रम म्हणून या आश्रमात १३० मुला-मुलींचा सांभाळ केला जात आहे. दरम्यान, मंगळवारी आश्रमातीलच एका अल्पवयीन मुलाने चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याने आश्रमाच्या सुरक्षिततेसह कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे बाल संरक्षण आयोगाने आश्रमाची पाहणी करत नियमांची पूर्तता होत आहे का, याची शहानिशा केली. त्यावेळी आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांऐवजी सर्वसामान्यांची पाल्ये सांभाळली जात असल्याचे आढळून आले. मृत आलोक याला वडील नसल्याने त्याच्या आईने आलोकसह आयुष या दोन्ही मुलांना आश्रमात पाठविले होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आश्रमात फक्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचेच संगोपन करणे अपेक्षित असून निराधार पाल्यांचे संगोपन करण्यासाठी बालकल्याण समितीची परवानगी आवश्यक असते. आश्रमाविरोधात बालकल्याण समितीकडे याआधीही तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे समितीकडून आश्रमाची परवानगी रद्द केली होती. त्यानंतरही हा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाकडून यासंदर्भात कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आश्रमाच्या व्यवस्थापकांच्या दाव्यानुसार, चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आश्रमाची नोंद आहे.

आश्रमावर झालेले आरोप

– आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी शहरातील नामांकित कंपनीने खाटा दिल्या होत्या. मात्र, त्या दिसून आल्या नाहीत.

– आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांपेक्षा एकल पालकांच्या पाल्यांना प्रवेश दिला जात असल्याने नियमबाह्य भरती प्रक्रिया.

– देणगीदारांच्या वाढदिवस, इतर कार्यक्रमांसाठी चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग करून घेणे, यामुळे चिमुकल्यांचे अभ्यासाकडे

हेही वाचा :

Back to top button