

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका कक्करला कोण ओळखत नाही. 'ससुराल सिमर का'मध्ये मुख्य भूमिकेत दीपिका दिसली होती. एवढेच नाही तर ही भूमिका साकारून तिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. दीपिका कक्करचे शोएब इब्राहिमसोबत दुसरे लग्न झाले आहे. (dipika kakkar ) दोघेही अनेक यूट्यूब व्हिडिओही बनवताना दिसत आहेत. दीपिका आणि शोएब दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी ब्लॅक आऊटफिटमध्ये या कपलने पापाराझींना अनेक पोज दिली. पण त्याचवेळी दीपिका कक्कर बाहेर पडत असताना तिचा पाय खड्ड्यात गेला. पहा पुढे काय झालं? (dipika kakkar)
हाय हिल्स घातल्यामुळे हा प्रकार घडला. मात्र, अभिनेत्रीने स्वत:ला सांभाळले. इतक्यात त्याच्यासोबत चालणारा एक चाहता तिला वाचवण्यासाठी पुढे आला. जेव्हा दीपिकाने कक्करला सावरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सावध राहून अभिनेत्री दीपिका तिच्यावर रागावू लागली. तिने सांगितले की, ती ठीक आहे. पण मला असा हात लावू नकोस. दीपिका कक्करच्या चेहऱ्यावर सौम्य संताप स्पष्टपणे दिसतो. यानंतर तो चाहता सॉरी म्हणत अभिनेत्रीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे.
video – celebphotoshoot01 insta