tick tock star रुची कदम झळकणार ‘सपान लागलं’ मध्ये - पुढारी

tick tock star रुची कदम झळकणार ‘सपान लागलं’ मध्ये

मुंबई; पुढारी ऑनलाईन: टिक टॉक स्‍टार ( tick tock star  ) आणि अभिनेत्री रुची कदम ‘सपान लागलं’ या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे. ‘सपान लागलं’ म्युझिक व्हिडिओ लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे.टिकटॉक स्‍टार ( tick tock star  )  रुची कदम आता नव्‍या प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे.

सोशल मीडियाच्या जमान्यात सध्या अनेक नवीन प्लॅटफॉर्म्स सुरु झाले, तर काही बंद झाले.

टिकटॉक ॲप ‘बॅन’ करण्याआधी गेल्या वर्षापर्यंत  हा प्लॅटफॉर्म तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होता.

देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक तरुण- तरुणी आपल्यातील कलागुण या प्लॅटफॉर्म सादर करत होते.

या प्लॅटफॉर्मवरसुद्धा ‘स्टार्स’ बनू लागले. ज्यांना TickTock star ही ‘पदवी’ मिळू लागली.

यातील अनेक जण म्युझिक व्हिडिओमध्ये दिसू लागले तर काहींनीं तर चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

कार्तिकी गायकवाडसोबत रुची कदम

याचदरम्यान सध्या टिक टॉक स्टार आणि मराठमाेळ्या अभिनेत्री रुची कदम हिने मनोरंजन चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

रुची कदमचे टिकटॉकवर  दहा लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

तसेच ती भारतीय ‘शॉर्ट व्हिडिओ’ प्लॅटफॉर्मवर तितकीच प्रसिद्ध आहे.

यामुळे तिच्या छोट्या- छोट्या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळते.

रुची कदम आता सर्वस्व एंटरटेन्मेंन्टच्या बॅनरखाली ‘सपान लागलं’ या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे.

लवकरच ‘सपान लागलं’ हा म्युझिक व्हिडिओ येत असून यात रुचीची ‘डॉक्टर डॉक्टर’ फेम ओंकार परदेशीसोबत रोमँटिक जोडी बनली आहे.

या गाण्यात ज्ञानेश्वरी गायकवाड सुद्धा झळकणार आहे.

हे गाणे सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड हिने गायिले आहे.

या गाण्यात कार्तिकीला आदर्श शिंदे व ओंकार परदेशी साथ दिली आहे.

या गाण्याला संगीत अनिल काकडे यांनी दिले आहे.

‘सपान लागलं’ हा व्हिडिओ लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

हेही वाचलंत का? 

 

 

Back to top button