नरेंद्र दाभोलकर प्रकरणात अखेर आरोप निश्चिती; आरोपींनी आरोप फेटाळले - पुढारी

नरेंद्र दाभोलकर प्रकरणात अखेर आरोप निश्चिती; आरोपींनी आरोप फेटाळले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बुधवारी गुन्ह्यातील पाच आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले. डॉ. विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, विक्रम भावे, ऍड. संजीव पुनाळेकर यांच्यावर ही आरोप निश्चिती करण्यात आली. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी ही आरोप निश्चिती केली. त्यामुळे आता खटला सुरू होण्यास मार्ग मोकळा झाला आहे.

बुधवारी नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. यामध्ये विरेंद्रसिंह तावडे येरवडा कारागृहातून, शरद कळसकर आर्थररोड कारागृहातून, सचिन अंदुरे औरंगाबाद करगगृहातून उपस्थित होते. तर याप्रकरणात जामीन मिळालेले ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे कोर्टात उपस्थित होते. सर्वांना आरोप कबूल आहे का अशी विचारणा केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

सुनावणी दरम्यान आरोपींनी वेळ गुन्हा निश्चित करण्यास वेळ मागितला. परंतु कोर्टाने आरोप निश्चिती करण्यास मुदतवाढ देता येणार नसल्याचे स्पष्ट करून गुन्हा कबूल नसल्याबाबत आरोपींचा जबाब नोंदविला. या प्रकरणात संजीव पुनाळेकर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तर इतरांवर खून तसेच यूएपीएच्या कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले.

हेही वाचले का?

Back to top button