उदयनराजे भोसले यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट! - पुढारी

उदयनराजे भोसले यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट!

बामणोली : पुढारी वृत्तसेवा

भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही भेट सातारा शहरातील विविध विकास कामांबाबत असल्याचे बोलले जात असले तरी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या भेटीवेळी मराठा आरक्षणाबाबतही चर्चा झाली. मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावे याबाबत देखील चर्चा करण्यात आली. मात्र उदयनराजे स्वतः साताऱ्यातून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी जाऊन भेट घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

जि. प. अध्यक्ष कबुले-उदयनराजे भेट

दरम्यान, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी जलमंदिर येथे जाऊन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच आ. मकरंद पाटील यांचे नेतृत्व मानणार्‍या उदय कबुले यांनी उदयनराजेंची जलमंदिर येथे जाऊन भेट घेतल्याने राष्ट्रवादीतील निष्ठावंतांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचले का?

Back to top button