पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन गायक निक जोनासला (Nick Jonas) टाईप १ मधुमेह आहे. त्याने अनुभवलेल्या काही लक्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त त्याने ही व्हिडिओ क्लिप शेअर केलीय. खरंतरं निक हा १३ वर्षांचा असताना त्याला मधुमेह असल्याचे समजले होते. निक जोनास हा एक प्रसिद्ध अमेरिकन गायक आहे. त्याने आपल्या गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्याच्या गायकीचे जगभरात कौतुक होत आहे. निकने देसी गर्ल प्रियांका चोप्राशी लग्न केल्यापासून तो आणखी चर्चेत आहे. निक आणि प्रियांका हे इंडस्ट्रीतील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक आहेत. तसे, चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. (Nick Jonas)
दरम्यान, निकने त्याला असलेल्या गंभीर आजाराविषयी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले आहे. वयाच्या १३व्या वर्षापासून निकला गंभीर आजार असल्याचं ऐकून अनेक चाहत्यांना धक्का बसला. तो १३ वर्षांचा असताना त्याला मधुमेह झाला होता.
निक जोनासला वयाच्या १३ व्या वर्षी टाईप १ मधुमेहाचे निदान झाले होते. त्याने अलीकडेच त्याच्या पहिल्या लक्षणांबद्दल सांगितले, जे त्याला मधुमेह असल्याचे कळण्यापूर्वी दिसले होते. ग्लोबल स्टारने हा माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ शेअर करण्यासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. नेटिझन्सनी त्याचे कौतुक केले. या व्हिडिओला ९ दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याबद्दल त्याने आभार मानले आहेत.
निकने व्हिडिओमध्ये टाईप १ मधुमेहाची वजन कमी होणे, जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे आणि चिडचिड होणे ही चार लक्षणे त्याच्यात होती, असे त्याने सांगितले आहे.
त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'टाईप १ मधुमेहाची मला ४ लक्षणे आहेत. जास्त तहान लागणे, वजन कमी होणे, वारंवार लघवी होणे, चिडचिड होणे. हे टाईप १ मधुमेहाची सामान्य लक्षणे म्हणून ओळखले जाऊ शकतात. इतरांना चिन्हे दिसावीत म्हणून मी माझे सूचक शेअर करत आहे.' नेटिझन्सनी उपयुक्त व्हिडिओसाठी जोनासचे आभार मानले आणि टाईप १ मधुमेहाशी संबंधित त्याचे काही अनुभव देखील शेअर केले.
एका यूजरने लिहिले की, 'शेअर करणे खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद.' दुसर्या युजरने लिहिले, 'या महत्त्वाच्या जुन्या परिस्थितीकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. मी ४१ वर्षांपासून #T1D आहे.'