महापालिका आयुक्तांचा तत्परतेचा दावा फोल; कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय | पुढारी

महापालिका आयुक्तांचा तत्परतेचा दावा फोल; कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय

दीपक पाटील

पौड रोड : गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेवर प्रशासकराज असून, नागरिकांची कामे वेळेत करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी तत्पर असल्याचा दावा प्रशासक आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे. मात्र, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयात हा दावा फोल ठरत असल्याचे नुकतेच दिसून आले आहे. कार्यालयाची वेळ झाल्यानंतरही बहुतांशी अधिकार्‍यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या.
या भागातील अनेक नागरिक आपल्या समस्या व इतर कामानिमित्त या कार्यालयात येत असतात.

मात्र, अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयाची कामकाजाची वेळ पावणेदहा असली, तरी प्रत्यक्षात या कार्यालयाचे कामकाज उशिरा सुरू होत असल्याचे दिसून आले. सकाळी अकरा वाजले, तरी अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह विभागातील खुर्च्या वळगता मिळकत कर कार्यालय, निविदा केंद्रसह विविध विभागांतील कार्यालयाच्या खुर्च्या मात्र रिकाम्या असल्याचे दिसून आले.

अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. काही कर्मचारी बीएलओच्या कार्यालयात कार्यरत आहेत. यामुळे सातच क्लार्क घेऊन काम करावे लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे.

    – केदार वझे, प्रभारी सहायक आयुक्त, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय

Back to top button