नाशिक : मविप्रच्या सेवक सोसायटीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ पॅनलने 17 जागांपैकी 16 जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर प्रतिस्पर्धी सेवक पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
गंगापूर रोड वरील मराठा हायस्कूमध्ये रविवारी ( दि.१३ ) सकाळी मतदान व सायंकाळी पाच वाजेनंतर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. विजयी समर्थ पॅनलचे नेतृत्व नानासाहेब दाते, गुलाबराव भांबरे, यांनी केले. पराभूत पॅनलचे नेतृत्व माविप्र संस्थेचे सेवक संचालक संजय शिंदे, सी. डी. शिंदे यांच्याकडे होते. सेवक सोसायटीच्या निवडणुकीमुळे नानासाहेब दाते व गुलाबराव भांबरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला. सेवक पॅनलचे नेतृत्व करणारे सेवक संचालक संजय शिंदे यांना विजयी करत मतदारांनी त्यांचेही नेतृत्व मान्य केले आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेत झालेल्या सत्ता परिवर्तना नंतर झालेल्या सेवक सोसायटी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
विजयी उमेदवार असे…
सुनील आहेर ,सुनील काळे ,नंदकुमार घोटेकर ,शांताराम चांदोरे, ज्ञानेश्वर जाधव, मंगेश ठाकरे, विनीत पवार ,मनीष बोरसे, अनिल भंडारे, गंगाधर ( आबा ) मोरे ,दत्तात्रय ह्याळिज, संजय शिंदे, बळीराम जाधव ,संजय नागरे ,किरण उघडे ,वैशाली कोकाटे ,सुवर्णा कोकाटे.
हेही वाचा:
- ruchira jadhav : बिग बॉस मराठीच्या घरामधून रुचिरा जाधव बाहेर !
- नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम
- ठाणे : आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल; मतदार संघातील कार्यकर्ते आक्रमक, मुंब्रा बायपासवर जाळपोळ (Video)