क्षमतेपेक्षा जास्त वर्कआउटचा हृदयावर परिणाम; ट्रेडमिलवर काय करावे आणि काय करू नये? | पुढारी

क्षमतेपेक्षा जास्त वर्कआउटचा हृदयावर परिणाम; ट्रेडमिलवर काय करावे आणि काय करू नये?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकारामुळे (हार्टअटॅक) मृत्यू पावण्याची प्रकरणे वाढत आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव आणि टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांची युवा पिढी तसेच व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाणारे चिंतेत सापडले आहेत. वर्कआउटपूर्वीची अपुरी झोप याचे एक कारण असून शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त वर्कआउटचा हृदयावर वाईट परिणाम होतो, असे हृदयविकार तज्ञांचे म्हणणे आहे.

कार्डिओलॉजिस्ट डॉ गणेश कुमार यांच्या मते, नियमित व्यायाम करणार्यांनीही काही तासांच्या झोपेने व्यायाम न करण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जिम सुरू करायची असल्यास त्यांनी आधी हृदय तपासणी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. समस्या अशी आहे की रक्तवाहिन्यांमधील लहान फ्लॅकचे साठे सामान्यतः सौम्य मानले जातात. मात्र, ब्लॉकेजेसच्या तुलनेत जिम करणे, धावणे, वजन उचलणे असो किंवा जास्त ताण-तणावामुळे अचानक क्रियाकलापाने फुटू शकतात. त्यामुळे काहीही न खाता किंवा फक्त तीन तास झोपून हृदयावर तीव्र परिणाम करणारे काम करणे योग्य नाही, असे डॉ. कुमार म्हणाले. हृदयाला रक्त पुरवठा होण्यात अडथळा आल्यावर हार्ट अटॅक येतो. हृदयाच्या मांसपेशींच्या एका भागात ऑक्सिजनयुक्त ब्लडच्या प्रवाहाची गती मंदावते. अनेकदा रक्तप्रवाह ब्लॉक होतो आणि हार्ट अटॅक येतो. हृदयाच्या मांसपेश्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि हृदय काम करणे बंद करते. आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा वर्कआउट केल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो.

काही लोक हे आपल्या शरीराची क्षमता नसूनही खूप जास्त वर्कआउट करतात. यामुळे शरीराची क्षमता ओळखूनच व्यायाम करायला हवा. अन्यथा हृदयावर वाईट परिणाम होतो. एका संशोधनानुसार, अनेक लोक आपला रनिंग इव्हेंट पूर्ण करतात. त्यानंतर त्यांच्या ब्लड सँपलमध्ये हार्ट डॅमेजसंबंधीत बायोमार्कर तयार होतात. हे काही काळानंतर रिकव्हरही होतात. मात्र हृदयावर सतत स्ट्रेस राहतो. ज्यामुळे ते टेंपरेरी डॅमेजचे गंभीर परिणाम दिसून येतात. तसेच ज्या लोकांना हार्टसंबंधित आजार असतील, त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते.

ट्रेडमिलवर काय करावे आणि काय करू नये याबद्दल मुलुंडच्या फोर्टिसचे सल्लागार डॉ. मनिष हिंदुजा यांनी दिलेले हे सल्ले –
  • सुरुवात हळूवारपणे करा, पहिल्या पाच मिनिटांत चालणे किंवा संथगतीने पळणे ठेवा. हळू आणि वेगाने पळण्यासाठी दिवसाआडच्या वेळा निश्चित करा. उतार कमीत कमी ठेवा. तीव्र चढ शक्यतो टाळा.
  • नव्याने सुरुवात करणाऱ्यांनी हळूहळू आपला वेग वाढवावा.
  • ट्रेडमिलवर तुमच्या हृदयाची गती तपासा. ही गती स्मार्ट वॉचमध्ये अथवा ट्रेडमिलमध्ये असलेल्या सेन्सर्समध्ये कळून येते.
  • हृदयाची गती अधिकतम गतीपेक्षा ७० टक्के कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. ही गती मध्यमवयीन व्यक्तीसाठी अंदाजे १५० / प्रति मिनिट असेल.
  • घाम येऊन छातीत जड भासणे, चक्कर येणे, जबड्यामध्ये कळा मारणे, ही हृदयविकाराची लक्षणे आहेत.
  • ज्यांना जास्ती घाम येतो त्यांनी सातत्याने पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

Back to top button