कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसरात पक्षीनिरीक्षण मोहीम; 35 प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन | पुढारी

कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसरात पक्षीनिरीक्षण मोहीम; 35 प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  पक्षी सप्ताहानिमित्त वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि बर्डस् ऑफ कोल्हापूर संस्थेतर्फे रविवारी रंकाळा तलाव परिसरात पक्षीनिरीक्षण मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी 35 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या. यामध्ये प्रामुख्याने ब्लिथचा वेळू वटवट्या, पिवळा धोबी, करडा धोबी, साधी तुतारी, साधा हिरवा टिलवा हे स्थलांतरित पक्षी तसेच शिक्रा, मोहोळ घार हे शिकारी पक्षी नोंदविले गेले.

या मोहिमेमध्ये महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर आणि पक्षी तज्ज्ञ आशिष कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
सृजन आनंद विद्यालय आणि आनंदी बाल भवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील पक्षी निरीक्षणाचा आस्वाद घेतला. पक्षीनिरीक्षण मोहिमेमध्ये वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, बर्डस् ऑफ कोल्हापूर संस्थेचे प्रणव देसाई, पृथ्वीराज सरनोबत, ऋतुजा पाटील, ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सतपाल गंगलमाले आदींचा सहभाग होता.

Back to top button