deepika and ranveer singh
Latest
रणवीर-दीपिका झाले अलिबागकर!, २२ काेटींना ९० गुंठे जागेची खरेदी
रायगड; पुढारी वृत्तसेवा : बाॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार रणवीर सिंग-दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत. रणवीर सिंग-दीपिका पदुकोण यांनी अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे एनए जागेची खरेदी केली आहे.
रणवीर आणि दीपिका यांनी अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे जागा २२ काेटी रुपयांना खरेदी केली आहे.
या ९० गुंठे एनए जजागेत दोन बंगले असून नारळ सुपारीची बागही आहे.
रणवीर सिंग-दीपिका पदुकोण आज अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयाच्या रजिस्टर करण्यासाठी आले होते.
त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचलं का ?
व्हिडिओ

