Stock Market Opening : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत सर्व धोरणकर्त्यांनी अल्प व्याजदरवाढीला अनुकूलता दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर संमिश्र संकेत आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि.२३) भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने स्थिर पातळीवर सुरुवात केली. त्यानंतर सेन्सेक्स- निफ्टीत चढ-उतार दिसून आला.
सुरुवातीला सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी खाली आला होता. त्यानंतर त्याने सुरुवातीचे नुकसान भरून काढत तेजीच्या दिशेने चाल केली आहे. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी वाढून ५९,८६० वर होता. तर निफ्टी १७,५८८ वर होता. अदानी समूहाच्या शेअर्सवर दबाव कायम असून त्यांचे १० पैकी ८ शेअर्स रेड झोनमध्ये गेले आहेत.
सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एनटीपीसी, इंडसइंड बँक, टायटन आणि रिलायन्स या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर एचसीएल, टाटा स्टील, टीसीएस, एल अँड टी आणि विप्रो हे वाढले आहेत. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.२७ टक्के आणि निफ्टी बँक ०.२१ टक्के खाली आला. निफ्टी आयटी आणि निफ्टी मेटल वधारला आहे. (Stock Market Opening)
हे ही वाचा :