Stock Market Opening : अमेरिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता फेडरल रिझर्व्ह दीर्घकाळ वाढीव व्याजदर कायम ठेवेल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (दि.१७) घसरण पहायला मिळाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला. तर निफ्टी १८ हजारांच्या खाली आला. १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १० निर्देशांक घसरले. हेविवेट फायनान्सियल्स आणि IT स्टॉक्स अनुक्रमे ०.५ टक्के आणि १.१६ टक्के घसरले. एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा आणि विप्रो निफ्टीवर टॉप लूजर्स होते. हे शेअर्स १.२५ टक्के ते २ टक्केच्या दरम्यान घसरले. बँकिंग स्टॉक्सही आज घसरले.
आयटी स्टॉक्समध्ये एल अँड टी टेक्नॉलॉजीस सर्व्हिसेस (-२.३१ टक्के), MphasiS Ltd (-२.१९ टक्के), विप्रो (-१.११ टक्के), एचसीएल टेक्नॉलॉजीस (-१.०४ टक्के), टाटा कन्सल्टंसी (-१.०४ टक्के), टेक महिंद्रा (०.८४ टक्के), इन्फोसिस (०.८४ टक्के) हे शेअर्स घसरले. (Stock Market Opening)
हे ही वाचा :