Disha Patani : दिशा पटानीने हॉट अदांचा लावला तडका (photos) | पुढारी

Disha Patani : दिशा पटानीने हॉट अदांचा लावला तडका (photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आलीय. आता तिचे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती यलो मिनी स्कर्ट घालून सुपर हॉट अंदाजात दिसत आहे. व्हाईट स्वेटर आणि हॅट घालून दिशाने आऊटफिटमध्ये हॉटनेसचा तडका लावला आहे. तिचे हे फोटोज फॅन्सच्या पसंतीस उतरत आहेत. दिशाने फोटो अपलोड केल्यानंतर काही मिनिटांतचं कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव झालाय. (Disha Patani)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिच्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती गुलाबी रंगाच्या स्वेटरमध्ये दिसत आहे. पटानीचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चर्चेत असतो. दिशाने यावर्षी दिवाळी उत्साहात साजरी केली. यासोबतच या प्रसंगी एका पार्टीत अभिनेत्री लाल रंगाचा लेहेंगा परिधान करून अतिशय सुंदर लूकमध्ये दिसली. दिशा इन्स्टाग्रामवर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने फोटो अपलोड करताच ते व्हायरल होतात. या ब्लॅक आउटफिटमधील पटानीचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. हा फोटो चाहत्यांना खूप आवडला.

रेड वेल्वेट ड्रेसमध्ये दिशाचा सेक्सी अवतार पाहून चाहते थक्क झाले. अभिनेत्री तिच्या फिटनेसमुळेही खूप चर्चेत आहे. या फोटोमध्ये दिशा तिच्या स्टाईलने लोकांची मने जिंकत आहे.

दिशाचे हे फोटोही पाहण्यासारखे आहे. या चित्रात अभिनेत्रीने पांढऱ्या क्रॉपटॉपसह मुकुट घातलेला दिसत आहे. दिशा या लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंहच्या ‘एमएस धोनी’ या चित्रपटातून दिशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिशाने पहिल्याच चित्रपटापासून आपल्या क्यूटनेस आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटानंतर, दिशा राष्ट्रीय क्रश बनली, दिशा एथनिक ते वेस्टर्न स्टाइलमध्ये अप्रतिम दिसते. त्याच वेळी, चाहते तिला पाहण्यासाठी आतुर आहेत आणि हेच कारण आहे की त्याचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर येताच ट्रेंड होऊ लागतो.

Back to top button