१५ वर्षांवरील मुस्लिम मुलीचा विवाह वैध; पती-पत्नीला एकत्र राहण्याची उच्च न्यायालयाची परवानगी | पुढारी

१५ वर्षांवरील मुस्लिम मुलीचा विवाह वैध; पती-पत्नीला एकत्र राहण्याची उच्च न्यायालयाची परवानगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंधरा वर्षांपेक्षा अधिक वयाची मुस्लिम मुलगी तिच्या पसंतीच्या कोणत्याही मुलाशी लग्न करू शकते आणि तिचा विवाह वैध मानला जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान शुक्रवारी हा निर्णय दिला. यासोबतच न्यायालयाने १६ वर्षीय मुलीला तिच्या पतीसोबत राहण्याची परवानगी दिली.

न्यायमूर्ती विकास बहल यांच्या खंडपीठासमोर जावेद नावाच्या एका व्यक्तीच्या बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेवर सुनावणी सुरू होती. या याचिकेत त्याच्या १६ वर्षीय पत्नीला त्याच्यासोबत राहण्याची परवानगी द्यावी, असे अपील करण्यात आले होते. सध्या ती मुलगी हरियाणातील पंचकूला येथील बालसुधारगृहात आहे. याचिकाकर्त्याने लग्नाच्या वेळी पत्नीचे वय १६ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सादर केले होते. दोघेही मुस्लिम असून त्यांनी 27 जुलै रोजी मनी माजरा येथील मशिदीत विवाह केला होता. हा विवाह तिच्या स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय झाला होता, असे याचिकाकर्त्याने आपल्या वकिलामार्फत सादर केले होते.

मुलगी अल्पवयीन असल्याचा दावा

युनूस खान विरुद्ध हरियाणा राज्य प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या समन्वय पीठाच्या निर्णयानुसार याचिकाकर्त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की मुलीला याचिकाकर्त्यासोबत राहण्याची परवानगी द्यावी. मात्र, राज्याच्या वकिलांनी या याचिकेला विरोध केला आणि सांगितले की, ती अल्पवयीन असल्याने तिला आशियाना होममध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे याचिका फेटाळण्याची मागणी त्यांनी केली होती.

हेही वाचा :

Back to top button