आजचे राशिभविष्य (दि. २९ ऑक्‍टोबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २९ ऑक्‍टोबर २०२२)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळू शकाल. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. जमीनविषयक व्यवहार गतिमान होतील. आर्थिक लाभ होतील.

वृषभ

वृषभ

वृषभ : जमीन व्यवहारात लाभ संभवतो. नोकरीत बदलाची शक्यता. सौंदर्यप्रसाधने व्यवसायात प्रगती करू शकाल. कौटुंबिक सुख मिळेल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : हितशत्रूंच्या कारवाया वाढू शकतात. राजकारणात विरोधकांच्या कारवाया काबूत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता.
राशिभविष्य
कर्क

कर्क : स्वास्थ्य जपा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. पाठदुखीचा त्रास संभवतो. स्वभावात चिडखोरपणा डोकावेल. शांत रहा. आप्तेष्टांच्या गाठी भेटी होतील.
सिंह
सिंह

सिंह : वाहन तसेच वास्तू खरेदीचे योग. नियमांचे पालन आवश्यक. एखाद्या समारंभाचे आयोजन संभवते. राजकीय क्षेत्रातील मंडळींना हा दिवस उत्तम संधी.
राशिभविष्य
कन्या

कन्या : बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणे जास्ती गरजेचे ठरेल. कामाच्या ज्ञानामध्ये अद्ययावत रहा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, प्रकृतीची व खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.
राशिभविष्य
तुळ

तूळ : बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. मालमत्ता खरेदीचा योग संभवतो. कौटुंबिक सुख मिळेल. प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होतील.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : राहत्या घराचे प्रश्न सुटतील. घरातील सुख-सुविधांवर खर्च करा. नूतनीकरण, सुशोभीकरण यासाठी खर्च कराल. पैशाची आवक चांगली राहील.
राशिभविष्य
धनु

धनु : अविवाहितांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. योग्य निर्णय घेतले जातील. कुटुंबातील ज्येष्ठांच्या चिंता मिळतील. डोळा व कानाच्या दुखण्यापासून सावध राहा.
राशिभविष्य
मकर

मकर : मित्रमंडळी कुटुंबीयांसमवेत बाहेर जाण्याचा बेत निश्चित होईल. कोणत्याही प्रकारचे चुकीची व बेकायदेशीर कामे करू नयेत. कुसंगतीपासून दूर राहा.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : सरकारी नोकरीत दिलासा मिळेल. प्रवासाचे योग येतील. तांत्रिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळेल. नावलौकिकात भर पडेल.
राशिभविष्य
मीन

मीन : रोजच्या कामात व्यस्त राहाल. घरगुती कामांची जबाबदारी वाढेल. नोकरीत सहकार्‍यांचे सहकार्य लाभू शकते. महत्त्वाचे काम झाल्यामुळे दिलासा मिळेल.

Back to top button