कार्तिक आर्यनकडे अनेक ऑफर्स | पुढारी

कार्तिक आर्यनकडे अनेक ऑफर्स

अभिनेता कार्तिक आर्यनने ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटापासून मोठी झेप घेतली आहे. कार्तिक हा रणबीर-शाहिद ग्रुपमधील सर्वात तरुण अभिनेता आहे.

अलीकडच्या काळात कार्तिकला अनेक मोठ्या बॅनरकडून चित्रपटाच्या ऑफर्स येत आहेत. कोरोना काळात केवळ 10 दिवसांत ‘धमाका’ चित्रपटाचे शूटिंग कार्तिकने संपवले होते. आता कार्तिक ‘फ्रेडी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

दरम्यान, निर्माता वासू भगनानी यांनी कार्तिकला एक नव्हे तर आगामी तीन चित्रपटांची ऑफर दिल्याचे समजते. अद्याप दोघांमध्ये या तीन चित्रपटांबाबत करार झालेला नाही; पण दोघेही या चित्रपटांबाबत पॉझिटिव्ह असल्याचे समजते.

कार्तिकच्या चित्रपटांबाबत बोलायचे तर त्याचा ‘धमाका’ नेटफ्लिक्सवर रीलिजसाठी तयार आहे. याशिवाय पुढील वर्षी तो कियारा अडवाणीसोबत ‘भूलभुलैय्या – 2’ या हॉरर कॉमेडीमध्ये दिसणार आहे.

‘फ्रेडी’मध्ये तो अलाया एफ.सोबत आहे. तर, अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमलो’च्या हिंदी रीमेकमध्ये कार्तिक कृती सेननसोबत दिसणार आहे.

Back to top button