मोहित रैना याने सांगितला काश्मीरमध्ये वडिलांना आलेला अनुभव

Mohit Raina
Mohit Raina
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अमेझॉन प्राईम व्हिडिओची आगामी ओरिजिनल 'मुंबई डायरीज २६/११' बहुप्रतीक्षित सीरीज आहे. याचे एक खास कारण आहे सीरीजमध्ये दिसणारी स्टारकास्ट. ज्यांनी २६/११च्या आतंकवादी हल्ल्याची एक वेगळी बाजू दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर मोहित रैना याने त्याच्या वडिलांना आलेले अनुभव सांगितले आहे. मोहित रैना याचे वडील काश्मीर बाहेरील गावांमध्ये सेवेत होते. तेथील अनुभव त्याने सांगितले.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मुंबई डायरीज २६/११' च्या ट्रेलरने दर्शकांना उत्साहित केले आहे. त्या दिवसांना उजाळा देत मोहित म्हणाला, "एक मुलगा म्हणून मी खूप भाग्यवान राहिलो आहे. कारण माझे वडील डॉक्टर आहेत. ते काश्मीरमधील गावांच्या बाहेरील भागात सेवेवर होते. दिवसाच्या अखेरीस, जेव्हा ते घरी येत असत, तरी प्रत्येक रात्री आपत्कालीन परिस्थितीमुळे आमचे दार अनेक वेळा ठोठावले जायाचे. त्यांना पुन्हा कोणाला तरी पहायला जावे लागत असे.

दिवसाच्या अखेरीस देखील ते रुग्णांना मदत करायाला नेहमीच सज्ज असत. ते जेव्हा परत येत, तेव्हा मी त्याच्या हावभावावरून समजत असे. ते रुग्णाला वाचवू शकले आहेत. त्यांच्या संपूर्ण क्षमतेनुसार ते त्याला मदत करू शकले आहेत. म्हणून मी आधीपासूनच फ्रंटलाइन वर्कर्सची कामाप्रतीची उत्कटता अनुभवू शकलो. त्यांच्याकडून प्रेरित होऊ शकलो हे माझे सद्भाग्य आहे. कदाचित हे मालिकेतदेखील उमटले आहे. ज्याचा भाग बनून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.

निखिल अडवाणीद्वारे रचित, एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस सहदिग्दर्शित 'मुंबई डायरीज २६/११' ही मालिका, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कथा आहे. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवले. त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांची अप्रकाशित कथा सादर करते.

या मालिकेमध्ये कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी यांच्या भूमिका आहेत. सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी यांच्याही महत्त्वाच्या ङूमिका आहेत.

मुंबई डायरीजचे प्रीमियर अमेझॉन प्राईम व्हिडिओवर ९ सप्टेंबर, २०२१ रोजी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news