Om Puri : खूप गरिबीत गेलं होतं ओम पुरी यांचं बालपण, मग एकेदिवशी ... | पुढारी

Om Puri : खूप गरिबीत गेलं होतं ओम पुरी यांचं बालपण, मग एकेदिवशी ...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड ते हॉलीवूडपर्यंत दमदार अभिनयाने देश-विदेशात आपल्या अभिनयाचा डंका वाजवलेले ओम पुरी यांचा आज १८ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस आहे. ओम पुरी यांचे पूर्ण नाव ओम राजेश पुरी होते. त्यांचा जन्म १९५० मध्ये पटियाला येथे झाला होता. (Om Puri) तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये त्यांचे निधन झाले. पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या ओमपुरींचे वडील भारतीय रेल्वेत नोकरी करत होते. ओम पुरी हे एक उत्तम अभिनेते होते. सामान्य माणसाचा जो चेहरा तुम्हाला नेहमी दिसतो. इतका सहज आणि सुंदर अभिनय त्यांचा होता. (Om Puri)

ओम पुरी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटातून केली होती. १९८३ मध्ये आलेल्या अर्ध सत्य या चित्रपटातून ते लोकांच्या नजरेत आले. ओम पुरी वयाच्या ६ व्या वर्षी चहाच्या स्टॉलवर चहाची भांडी स्वच्छ करायचे. पण अभिनयाची आवड त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत घेऊन गेली. १९८८ मध्ये, ओम पुरी यांनी दूरदर्शनच्या प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘भारत एक खोज’ मध्ये अनेक भूमिका साकारल्या ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यांनी एका दिलेल्या मुलाखती स्वत:च्या मृत्यूबद्दल सांगितले आणि त्यांचा मृत्यू अचानक होणार असल्याचे सांगितले होते. मार्च २०१५ मध्ये घेतलेल्या या मुलाखतीत ते म्हणाले होते की, “तुम्हाला माझ्या मृत्यूबद्दल माहितीही नसेल. आणि सकाळी तुम्हाला माझ्या निधनाबद्दल कळेल की सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी ओम पुरी यांचे निधन झाले. असे बोलून ते हसले. असंच काहीसं झालं. ओम पुरी यांचा मृतदेह त्यांच्या घरी विवस्त्र अवस्थेत आढळून आला होता. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले होते.

ओम पुरी यांची दुसरी पत्नी नंदिता पुरी यांनी लिहिलेले ओम पुरी यांचे चरित्र ‘अनलाइकली हीरो: द स्टोरी ऑफ ओम पुरी’ २००९ मध्ये प्रकाशित झाले. तेव्हा ओम पुरी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी उजेडात आल्या होत्या. त्यांचे अनेक महिलांशी संबंध आल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे ओमपुरी म्हणाले होते की, नंदिताने या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रतिमा डागाळली.

‘मिर्च मसाला’, ‘जाने भी दो यारो’, ‘आंटी ४२०’, ‘हेरा फेरी’, ‘मालामाल विकली’ यांसारखे कितीतरी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. ज्यात तो वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये दिसतोय माहीत नाही. अर्धसत्य चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ओम पुरी यांचे बालपण गरिबीत गेले आणि त्यांनी दीर्घ संघर्षानंतर हे यश मिळवले होते.

Back to top button