Russia Aircraft Crash : दक्षिण रशियाच्या येस्क शहरात लष्करी विमान कोसळले, तीन ठार, २१ जखमी | पुढारी

Russia Aircraft Crash : दक्षिण रशियाच्या येस्क शहरात लष्करी विमान कोसळले, तीन ठार, २१ जखमी

पुढारी ऑनलाईन : रशियाच्या दक्षिणेकडील येस्क शहरात सोमवारी (दि.17) लष्करी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. हे लष्करी विमान एका निवासी इमारतीवर कोसळल्याने इमारतीला आग लागून या दुर्घटनेत जीवितहानी झाली. या दुर्घटनेत इमारतीतील तिघा रहिवाशांचा मृत्यू झाला तर, सुमारे २१ जण जखमी झालेत. एका आतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने या दुर्घटनेची माहिती दिली आहे.

रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, Su-34 च्या एका इंजिनला उड्डाण करत असताना आग लागल्याने येस्क या बंदर शहरामध्ये हे लष्करी विमान खाली कोसळले. ते म्हणाले की, यामधील दोन्ही क्रू मेंबर्स सुरक्षितपणे बाहेर पडले पण विमान एका निवासी भागात कोसळले. हे लष्करी विमान एका इमारतीवर कोसळून काही अपार्टमेंटला भीषण आग लागली. यामध्ये तीन रहिवासी ठार झाले तर २१ जण जखमी झाले असून, त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. रशियातील आपत्ती व्यवस्थापणाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. येस्क हे ९०,००० लोकसंख्या असलेले शहर आहे.

हेही वाचा:

Back to top button