औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका | पुढारी

औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

पुढारी ऑनलाईन : औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तात्काळ एअर ॲम्ब्युलन्सने मुंबई हलवण्यात आले आहे. सध्या ते शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे आमदार आहेत. त्यांच्यावर काल दुपारपासून औरंगाबादमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. आज तातडीने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते.

उपचार करणारे डॉ. टाकळकर काय म्हणाले ?

आमदार संजय शिरसाट यांना मंगळवारी सकाळी सिग्मा हॉस्पीटलमधून मुंबईला पाठविण्यात आले आहे. तत्पूर्वी त्यांच्यावर सिग्मा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. उन्मेश टाकळकर यांनी सांगितले, आमदार संजय शिरसाट यांना काल दुपारी अस्वस्थ वाटू लागले होते. आमच्या टीमने घरी जाऊन त्यांची तपासणी केली, त्यानंतर त्यांना हॉस्पीटलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते सायंकाळी ५ वाजता आमच्याकडे भरती झाले. त्यांचा बीपी वाढलेला होता. तो कंट्रोल करुन आम्ही त्यांना पुढील तपासण्यांसाठी मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. त्याआधी मी स्वत: रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीच शिरसाट यांना मुंबईला नेण्यासाठी सकाळी एअर ॲम्ब्युलन्स पाठविली, असेही टाकळकर यांनी सांगितले.

Back to top button