वयाची पन्नाशी ओलांडूनही अभिनेत्रींसोबत कसून रोमान्स करणारा अक्षय कुमार | पुढारी

वयाची पन्नाशी ओलांडूनही अभिनेत्रींसोबत कसून रोमान्स करणारा अक्षय कुमार

पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाची पन्नाशी ओलांडूनही प्रत्येक भूमिकेत फिट बसणारा अभिनेता अशी ओळख अक्षय कुमारने निर्माण केली आहे. अक्षय कुमार याने वयाची ५३ वर्षे पूर्ण केली आहेत. पण, अक्षयची ‘बातही कुछ और है’. यात त्याचा अभिनयाचा भाग सोडला तर त्याचा फिटनेस होय. ५३ व्या वर्षीदेखील त्याच्या फिटनेसचा मुकाबला कुणाशीही होऊ शकत नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

अक्की आपल्या फिटनेसमुळे ३० वर्षाच्या अभिनेत्यांनाही मात देतो.

पन्नाशी ओलांडल्यानंतरही एका तरुण अभिनेत्याप्रमाणे चित्रपटांमध्ये रोमान्स करणाऱ्या अक्षयला पाहून तुम्हीही म्हणाल व्वा! क्या बात है!

तो फिटनेस फ्रीक हैं. मार्शल आर्ट्स, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, नॅच्युरल थेरपी, शिस्तबध्द जीवनाची त्याने अंमलबजावणी केलीय. त्याने स्वत:चे शरीर स्पोर्टी आणि टोन्ड केली आहे. तो बॉलीवूड इंडस्ट्रीचा असा अभिनेता आहे ज्याने पार्टी आणि दारूपासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

निम्म्या वयाच्या अभिनेत्रींसोबत अभिनय

वाणी कपूर

‘बेल बॉटम’ या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत होती. चित्रपटात तो वाणीसोबत रोमान्स करताना दिसला. दोघांच्या वयामध्ये २० वर्षांचं अंतर आहे.

कियारा आडवाणी

अक्की-कियारा आडवाणी यांचा ‘गुड न्यूज’ चित्रपट रिलीज झाला. पण, ‘लक्ष्मी’ चित्रपटामध्ये दोघांचा ऑनस्क्रीन रोमान्स दिसला. त्यावेळी कियारा २८ वर्षांची होती. दोघांच्या वयातील फरक २५ वर्ष आहे.

नुपुर सेनन

नुपुर सेननसोबत तो फिलहाल २ चित्रपटात दिसला. यातील एका गाण्यात दोघे रोमान्स करताना दिसला. अक्षय कुमार ५३ वर्षांचा होता. तर नुपुर केवळ २५ वर्षांची होती. हे दोन्ही गाणी सुपरहिट ठरले होते.

निकिता दत्ता

२०१८ मध्ये कुमारचा गोल्ड चित्रपट रिलीज झाला होता. गोल्डमध्ये तो निकिता दत्तासोबत रोमान्स करताना दिसला. निकिता केवळ २७ वर्षांची होती. दोघांमध्ये २६ वर्षांचे अंतर आहे. म्हणजे, निकिता त्याच्यापेक्षा निम्म्या वयाची होती.

मधुरिमा तुली

२०१५ मध्ये बेबी हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटामध्ये तो मधुरिमा तुलीसोबत दिसला होता. मधुरिमा आणि त्याच्यात जवळपास २० वर्षांचं अंतर आहे.

एमी जॅक्सन

अक्कीने २०१५ मध्ये चित्रपट सिंह इज ब्लिंगमध्ये एमी जॅक्सनसोबत काम केलं होतं. दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. दोघांच्या वयामध्ये २४ वर्षांचं अंतर आहे.

सोनाक्षी सिन्हा

२०१३ मध्ये रिलीज झालेला वन्स अपोन अ टाइम इन मुंबई या चित्रपटात अक्कीने सोनाक्षी सिन्हासोबत अभिनय केला. सोनाक्षी सिन्हा आणि अक्की यांच्या वयामध्ये २० वर्षांचा फरक आहे.

भूमी पेडनेकर

२०१७ मध्ये टॉयलेट एक प्रेम कथामध्ये अक्की आणि भूमी पेडनेकर यांची जोडी दिसली होती.

भूमी केवळ ३२ वर्षांची होती. दोघांमध्ये २१ वर्षांचा फरक आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button