सदनिका घोटाळा : पंकज, समीर भुजबळ यांच्यासह दोघांची निर्दोष मुक्तता | पुढारी

सदनिका घोटाळा : पंकज, समीर भुजबळ यांच्यासह दोघांची निर्दोष मुक्तता

मुंबई, पुढारी ऑनलाईन : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांची मुंबई विशेष सत्र न्यायालयान एका प्रकरणात निर्दोष सुटका केली आहे. भुजबळ यांचयासह देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​इतर दोन संचालक राजेश धारप आणि सत्यन केसरकर यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.

या चौघांवर नवी मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अॅक्ट (MOFA) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

कोल्हापूर : प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, गावातील मुलीवरील प्रेम जीवावर बेतले

कंगनाची ‘मानहानी’ प्रकरणी दाखल याचिका न्‍यायालयाने फेटाळली

चेंबूर येथील एका व्यक्तीच्या तक्रारीवरुन २०१५ मध्ये भुजबळ बंधूंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भुजबळ बंधूंवर मुंबई सत्र न्यायालयाने गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामामध्ये फसवणूक झाल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला होता. त्याची सुनवाणी सुरू होती.

२०१५ मध्ये भुजबळ बंधुसह दोघांच्या कंपनीने २,३४४ फ्लॅट विकण्याची योजना आखली होती आणि त्यांनी त्यापोटी ४४ कोटी रुपये गोळा केले होते.

हा प्रकल्प विकसितच केला नव्हता असे म्हटले आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३९ अंतर्गत चारही व्यक्तींना निर्दोष ठरवत आरोपींची मुक्तता केली आहे.

युनूस शेख यांनी १३ जून २०१५ ही रोजी तक्रार नोंदवल्यानंतर समीर भुजबळ आणि केसरकर न्यायालयात हजर झाले.

त्यावेळी त्यांना लगेच जामीन मंजूर करण्यात आला.

फ्लॅटधारकांना फसविले

देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (डीआयपीएल) संचालकांनी आरोपातून मुक्त करण्यासाठी अर्ज केले होते.

या चौघांनी खारघरमधील २५ एकर जागेवर प्रोजेक्ट हेक्सवर्ल्ड विकसित करणार असल्याचे सांगितले होते.

त्यासाठी बांधकाम परवानगी आणि जमिनीचा ताबा नसल्याचे माहीत असूनही त्यांनी फ्लॅट खरेदीधारकांना फसविले असा आरोप ठेवण्यात आला.

२,३४४ फ्लॅट विक्रीतून खरेदीदारांकडून ४४.०४ कोटी गोळा केले. त्यांनी या विक्रीतून मिळालेली रक्कम एका खात्यात जमा केली होती.

याचा उपयोग त्या प्रकल्पासाठी न करता तो वैयक्तिक वापरासाठी केला.

खरेदीदारांना बुकिंगची रक्कम परत केली नाही तसेच फ्लॅटही दिला नाही, असे आरोपपत्रात नमूद केले होते. या प्रकरणात भुजबळ बंधूंची मुक्तता केली आहे.

हेही वाचा: 

Back to top button