Condom वरून प्रनुतन बहल हिचा बोल्ड प्रश्न, ‘हेलमेट’मुळे आलीय चर्चेत

Condom वरून प्रनुतन बहल हिचा बोल्ड प्रश्न, ‘हेलमेट’मुळे आलीय चर्चेत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वीच प्रनुतन बहल आणि अपारशक्ती खुरानाचा 'हेलमेट' हा चित्रपट रिलीज झालाय. प्रनुतन बहल हिची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. तिने रुपाली ही भूमिका साकारली आहे. रुपाली बिनधास्‍त असून ती न घाबरता बेधडकपणे कंडोमची विक्री करताना दाखवण्यात आली आहे.

जी ५ वर एक कॉमेडी चित्रपट रिलीज झाला आहे. 'हेलमेट' हा अपारशक्त्ती खुरानाचा पहिला चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता.

आपण पाहतो की मेट्रो सिटीमध्ये सर्रास आणि बिनधास्त मुली कंडोम खरेदी करतात. काही जाहिरातींमध्ये तर स्पष्टपणे ही वस्तू मुली दुकानदाराकडे मागताना दाखवण्यात आलं आहे.

मुलींनी कंडोम खरेदी केलं तर बिघडलं कुठं?

"मुलींनी कंडोम खरेदी केलं तर त्यात गैर काय?", असा प्रश्न प्रनुतनने विचारला आहे. त्यामुळे तिची खूप चर्चा होताना दिसतेय. प्रनुतन ही दिग्गज अभिनेत्री नूतन यांची नात आणि अभिनेता माेनिष बहल यांची कन्‍या आहे. तिचा हेलमेट हा चित्रपट चर्चेत आलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात कंडोमविषयी जागृती दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कंडोमविषयीचे समज-गैरसमज दाखवण्यात आले आहे.

प्रनुतनने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला कंडोमविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तिने दिलेल्या उत्तरामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवाय ती चर्चेत आली आहे.

प्रनुतन म्हणते-एखादी मुलगी मेडिकलमध्ये गेली आणि तिने कंडोम खरेदी केले. त्यानंतर तिच्या आजूबाजूचे लोक लगेच तिच्याकडे एकटक पाहू लागतात. पण, मला एक सांगा जर एखाद्या मुलीने कंडोम खरेदी केले तर त्यात गैर काय आहे? हा कोणता गुन्हा तर नाही ना!

आपल्या समाजात सेक्स एक टॅबू मानला जातो. त्यामुळे कंडोमविषयी बोलताना अनेक जण काचरतात. 'हेलमेट' चित्रपटातून या विषयावर प्रकाश टाकण्यात आलाय. कंडोम खरेदी करण्यात काहीच चूक नाही. हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलंय.

कंडोमच्या खरेदीमुळे वाढती लोकसंख्या, अनेक आजार, अनावश्यक प्रेग्नसी अशा गोष्टी टाळता येतात. मी स्वत: तर कधीच कंडोम खरेदी केले नाही. पण, हेलमेटच्या मदतीने समाजातील हा कंडोमविषयी असलेला गैरसमज दूर होईल. मुलींना आत्मविश्वासाने कंडोमची खरेदी करता येईल.

#Helmet ची कहाणी काय आहे?

'आपल्या देशात कंडोम खरेदी करणं एक राष्ट्रीय समस्या आहे.' हा डायलॉग अपारशक्त्ती चित्रपटात एका जागी वापरण्यात आलंय. हे ऐकून वाटतं की, जर पाच वर्षांनंतरदेखील असा चित्रपट तयार जाला तर हा डायलॉग वापरू शकतो. डायलॉग जुना वाटणार नाही.

मोबाईलचा ट्रक समजून चोरी करतात Condom

तीन तरुण आहेत. त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं. ते शॉर्टकटचा मार्ग अवलंबतात. मोबाईलने भरलेला ट्रक ते लुटतात. डबा उघडल्यानंतर समजतं की, ट्रकमध्ये मोबाईल नाही तर कंडोम होते. ट्रकभरून कंडोमचं करायचं काय? इतके कंडोम्स जाळून टाकू शकत नाही.

तर तिघेजण मिळून कंडोमची होम डिलिव्हरी सुरू करतात. डोक्यावर 'हेलमेट'घालून कंडोम विकतात. त्यामुळे कंपनीचं नावदेखील हेलमेट असं ठेवतात.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news