‘तुझी माझी रेशीमगाठ’ : मायराचे आई-बाबांसोबत पोलक्यात फोटोशूट
मुंबई; पुढारी ऑनलाईन: अभिनेता श्रेयश तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची 'तुझी माझी रेशीमगाठ' ही मालिका चाहत्यांच्या घरांघरात पोहोचली आहे. या मालिकेचे मुख्य आकर्षण छोटीशी परी अर्थातच मायरा बनली आहे.
या मालिकेतील मायराने श्रेयशला कमवतो किती? हा प्रश्न विचारताच ती खूपच चर्चेत आली. सध्या मायराने आपल्या खऱ्या आई-वडिलांसोबत पारंपारिक वेषभूषेत फोटोशूट केले आहेत.
आई-वडिलांसोबत पारंपारिक लूक
'तुझी माझी रेशीमगाठ' मधील मायराने नुकतेच आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत परी बनून सर्वांचं मन जिंकलेली मायरा खऱ्या आई-वडिलांसोबत पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे.
या फोटोत मायरा गुलाबी रंगाच्या पोलक्यात (घागरा चोली)दिसत आहे. तर मायराच्या आईने गुलाबी रंगाची नऊवारी आणि वडिलांनी त्याच रंगाचे घोतर नेसले आहे.
या फोटोतीस खास म्हणजे, मायराच्या कुटूंबियांनी एकाच रंगाची वेशभूषा परिधान केली आहे. याशिवाय मायरा आणि तिच्या आईच्या ब्लाऊजच्या पाठीमागे पारंपरीक वेषभूषेत सुंदरशी तरुणी दिसत आहे.
मायराच्या या हटके फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच, चाहत्यांनी कॉमेंन्टसचा पाऊस पाडला आहे. मायराच्या इंन्स्टाग्रामवर तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.
झी मराठी'वर २३ ऑगस्ट २०२१ पासून 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत चिमुरडीच्या भूमिकेत मायरा वैकुळ दिसते. मायराच्या यूट्युब चॅनलचे आतापर्यंत ९९.८ हजारहून अधिक सबस्क्रायबर झाले आहेत. काही दिवसातच ती एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडणार आहे.
हेही वाचलंत का?
(photo, video: _world_of_myra_, shwetavaikul and _world_of_myra_official वरून साभार)

